Join us

अग्गंबाई सासूबाईच्या सेटवर दिसली ही जुनी अभिनेत्री, गुपचूप या मराठी चित्रपटात केले आहे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 16:44 IST

रंजना, अशोक सराफ, कुलदीप पवार, महेश कोठारे, पद्मा चव्हाण, श्रीराम लागू, आशालता वागबांवकर, शरद तळवळकर यांच्या मुख्य भूमिका असलेला गुपचूप गुपचूप हा चित्रपट ऐंशीच्या दशकात प्रचंड गाजला होता.

ठळक मुद्देगुपचूप गुपचूप या चित्रपटात शामाच्या भूमिकेत आपल्याला शुभांगी रावतेला पाहायला मिळाले होते. अतिशय लाडावलेली शामा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटात शुभांगी या महेश कोठारे यांच्या नायिका होत्या.

अग्गंबाई सासूबाई ही प्रेक्षकांची प्रचंड आवडती मालिका आहे. या मालिकेच्या सेटवर काही दिवसांपूर्वी एका जुन्या अभिनेत्रीने हजेरी लावली. या अभिनेत्रीने अनेक जुन्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. गुपचूप या चित्रपटातील या अभिनेत्रीच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले होते.

रंजना, अशोक सराफ, कुलदीप पवार, महेश कोठारे, पद्मा चव्हाण, श्रीराम लागू, आशालता वागबांवकर, शरद तळवळकर यांच्या मुख्य भूमिका असलेला गुपचूप गुपचूप हा चित्रपट ऐंशीच्या दशकात प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील अशोक सराफ यांनी साकारलेले प्रोफेसर धोंड हे पात्र तर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील रंजना यांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. पाहिले न मी तुला... हे या चित्रपटातील गाणे तर आजही रसिकांच्या ओठी रुळलेले आहे. या चित्रपटात शामाच्या भूमिकेत आपल्याला शुभांगी रावतेला पाहायला मिळाले होते. अतिशय लाडावलेली शामा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटात शुभांगी या महेश कोठारे यांच्या नायिका होत्या. या चित्रपटातील शुभांगी यांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यांनी या चित्रपटानंतर मामला पोरींचा या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात निवेदिता सराफ देखील महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. या चित्रपटापासून निवेदिता आणि त्यांची खूपच चांगली मैत्री जमली. त्यांना नुकतेच त्यांच्या मैत्रिणीसोबत अग्गंबाई सासूबाईच्या सेटवर पाहाण्यात आले. 

शुभांगी रावते यांचे लग्नानंतरचे आडनाव म्हात्रे असून त्या अभिनयक्षेत्रापासून दूर असल्या तरी सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्यांच्या फेसबुकच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांचे अनेक फोटो पाहायला मिळतात. त्यांनीच अग्गंबाई सासूबाई या चित्रपटाच्या सेटवरचे फोटो फेसबुकला पोस्ट केले आहेत. तसेच झी मराठी पुरस्कार सोहळ्यात देखील त्यांनी काही महिन्यांपूर्वी हजेरी लावली होती. त्यांचे या सोहळ्यातील फोटो देखील त्यांच्या फेसबुकच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात.

त्यांनी निवेदिता सराफ यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करून खूप वर्षांपासूनची मैत्री असे कॅप्शन लिहिले आहे. 

टॅग्स :अग्गंबाई सासूबाईनिवेदिता सराफ