Join us

आनंद आणि आदर्श आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:29 IST

पोश्टर बॉईजनंतर सोनाली कुलकर्णी साकारत असलेल्या पोश्टर गर्लची अनेक गाणी, टीझर चित्रपट प्रदर्शनापूर्वीच प्रचंड पसंती मिळवत आहेत. या चित्रपटातील ...

पोश्टर बॉईजनंतर सोनाली कुलकर्णी साकारत असलेल्या पोश्टर गर्लची अनेक गाणी, टीझर चित्रपट प्रदर्शनापूर्वीच प्रचंड पसंती मिळवत आहेत. या चित्रपटातील एक गाणे नुकतेच लाँच करण्यात आले असून आनंद आणि आदर्श शिंदे या गाण्यासाठी प्रथमच एकत्र आले आहेत. 'आवाज वाढव डीजे तुला आईची शप्पथ आहे,' असे हे गाणे असून ते सर्वांना वेड लावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्षितिज पटवर्धन यांनी हे गाणे लिहिले असून अमितराज यांनी संगीतबद्ध केले आहे.