Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिंपल पण सुंदर दिसते गिरीजा ओक, साडीतल्या फोटोतून घातली चाहत्यांना मोहिनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 07:15 IST

मालिका, सिनेमा आणि मराठी रंगभूमी गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक-गोडबोले.

मालिका, सिनेमा आणि मराठी रंगभूमी गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक-गोडबोले. नेहमीच तिचे चाहते तिच्या अभिनयाच्या प्रेमात तर पडतातच मात्र आता तिच्या सोज्वळ सौदर्यांच्या प्रेमातही पडले आहेत.

गिरीजाने सफेद रंगाच्या साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या साडीत गिरीजाचे सौंदर्य आणखी खुललं  आहे. यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षा क्लीन बोल्ड करत आहे. या फोटोवर गिरीजाचे फॅन्स आणि रसिकांकडून लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. या फोटोतील सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

 

जाहिराती, मालिका, सिनेमा, नाटक यानंतर गिरीजा शॉर्टफिल्मच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला आली होती. सोशल मीडियाच्या युगात तर कलाकारांपुढची आव्हानं आणखी वाढली आहेत. त्यामुळेच कोणत्याही माध्यमात भूमिका साकारत आव्हान पेलण्याची कलाकारांची तयारी असते. असंच आव्हान गिरीजाने पेलले होते. ‘क्वॉर्टर’ या शॉर्टफिल्ममध्ये ती झळकली होती. यांत गिरीजाचा वेगळा लूक रसिकांना पाहायला मिळाला. आजवर विविध माध्यमांतून वेगवगेळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्यास मिळाल्या असल्या तरी ‘क्वॉर्टर’मधली भूमिका अभिनेत्री म्हणून समाधान देणारी असल्याचेही गिरीजाला सांगितले होते.

टॅग्स :गिरिजा ओक