Join us

मराठीतील पहिली वेब सिरीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 10:17 IST

सध्या नेटवर विविध वेब सिरीजनी धूमाकूळ घातलेला दिसत आहे

सध्या नेटवर विविध वेब सिरीजनी धूमाकूळ घातलेला दिसत आहे.जसे की, छोट्या छोट्या भागांच्या मालिकांच्या हटके वेब सिरीज नेटवर रिलीज करण्याचा हा नवा फंडा सर्वांनाच्या पसंतीस उतरलेला देखील दिसत आहे. विशेषत: हिंदी व इंग्रजी भाषेत हा ट्रेण्ड चांगलाच रूळला आहे.आता,हाच फंडा अमलात आणून मराठीत देखील पहिली वहिली वेब सिरीज लवकरच येत आहे. ती भा.डी.प. म्हणजेच भारतीय डीजीटल पार्टी या युट्युब चॅनेलची कास्टिंग काउच विथ अमेय अ‍ॅण्ड निपुण अशी ही पहिली वेब सिरीज असणार आहे. नुकतेच कास्टिंग काउचचा  टीझर देखील  प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वेब सिरीजच्या पोस्टरमध्ये अमेय आणि निपुण हे काउचवर बसलेले दिसतात. आणि त्यांच्या मधोमध एक तरुणीदेखील बसली आहे. पण तिचा चेहरा प्रश्नचिन्हाने झाकल्याने ही तरुणी नक्की कोण, असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. तर ती आहे बॉलीवुड व मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लई भारी मुलगी राधिका आपटे.आता  सर्वांनाच मराठीतल्या ह्या पहिल्या-वहिल्या वेब सिरीजची प्रचंड उत्सुकता लागली असणार हे नक्की.