पहिल्यांदा मराठी चित्रपटसृष्टीत नवीन प्रयोगांनी परिपूर्ण चित्रपट बनविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 17:26 IST
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत एकापाठोपाठ अनेक नवीन चित्रपट येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता प्रेमाय नम: हा चित्रपटदेखील लवकरच प्रेक्षकांच्या ...
पहिल्यांदा मराठी चित्रपटसृष्टीत नवीन प्रयोगांनी परिपूर्ण चित्रपट बनविण्याचा प्रयत्न
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत एकापाठोपाठ अनेक नवीन चित्रपट येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता प्रेमाय नम: हा चित्रपटदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा मराठी चित्रपटसृष्टीत वेगळे काही प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. असे हे प्रयोग यापूर्वी आपण बॉलिवुडमध्ये पाहायला मिळाले आहे. या चित्रपटातील एका संपूर्ण गाण्याची शूटिंग पाण्याखाली करण्यात आली असून या चित्रपटाचे प्रमोशन मालवणी किनापट्टीवर समुद्रात स्कुबा डायविंगच्या माध्यमातून करण्यात आले. आणि महत्वाची बाब म्हणजे या टीमने अजून एक प्रयोग करून दाखवला आहे. तो म्हणजे या टिमने मराठीत पहिल्यांदाच अॅड्राईड गेम आणला आहे. आता हा गेम कसा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली असणार हे नक्की. असे हे दोन प्रयोग पहिल्यांदा मराठी चित्रपटसृष्टीत करण्यात आले आहे. प्रेमाय नम:.. प्रेमाची एक नवीन परिभाषा सांगणारा हा चित्रपट असणार आहे. एका अनोख्या प्रेम कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात देवेंद्र आणि रुपाली हे नवीन फ्रेश चेहरे दिसणार आहे. या चित्रपटाचं ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ट्रेलर बघता चित्रपटातील लोकेशन आणि अॅक्शन यावर बरीच मेहनत घेतली असल्याचे दिसून येते. चित्रपटाचे दिग्दर्शक जगदीश वाठारकर असून संगीतकार के.संदीप आणि चंद्रशेखर जनवाडे आहेत. तसेच धनाजी यमकर हे कॅमेरा मॅन आहेत.प्रेमाय नम: हा चित्रपट २४ फेब्रुवारील्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणखी काही दिवस या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे.