स्टॉप मोशन अॅनिमेशनचा पहिल्यांदाच प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 19:31 IST
‘आम्ही दोघे राजा राणी’ या रोमँटिक कॉमेडी जॉनर असलेल्या मालिकेचे टायटल सॉँग सध्या चर्चेत आहे. मराठीत पहिल्यांदाच स्टॉप मोशन ...
स्टॉप मोशन अॅनिमेशनचा पहिल्यांदाच प्रयोग
‘आम्ही दोघे राजा राणी’ या रोमँटिक कॉमेडी जॉनर असलेल्या मालिकेचे टायटल सॉँग सध्या चर्चेत आहे. मराठीत पहिल्यांदाच स्टॉप मोशन अॅनिमेशनचा प्रयोग या टायटल सॉँगच्या निमित्ताने बघावयास मिळत असून, दीप्ती लेले आणि मंदार कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आहे. दोन भिन्न स्वभाव, विचार, राहणीमान असलेल्या शहरातील माणसे, एकमेकासमोर येतात. काहीवेळा टोकाचा विरोध तर कधी परिस्थितीशी जुळवून घेणे. त्यात प्रत्येक कुटुंबाच्या अतरंग स्वभावातील वातावरणात बहरणारी प्रेमकथा मालिकेत बघावयास मिळणार आहे. मराठीत पहिल्यांदाच स्टॉप मोशन अॅनिमेशनचा प्रयोग मालिकेच्या टायटल साँगच्या निमित्ताने करण्यात आला आहे. वैभव जोशी लिखित या शीर्षकगीताचे शशांक पोवार यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. तसेच रोहित राऊत आणि मधुरा कुंभार या जोडीने हे गाणे गायले आहे. केवळ हलत्या चित्रावर सादर झालेले गीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.संगीता राकेश सारंग यांच्या कॅम्सक्लबने या मालिकेची निर्मिती केली आहे. विजय पटवर्धन, समीर चौघुले आणि अभिजित पेंढारकर मालिकेचे लेखन करत असून, संचित वर्तक दिग्दर्शन करत आहेत. मंदार, दीप्तीसोबत मिलिंद फाटक, विनय येडेकर, मैथिली वारंग, सुलेखा तळवलकर,शीतल शुक्ल आदींच्या भूमिका आहेत.