' आर्त' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 10:37 IST
राजेंद्र जी.साळी लिखित, दिग्दर्शित 'आर्त' चित्रपटाच्या माध्यमातून जातपंचायत या व्यवस्थेवर कटाक्ष टाकण्यात आला आहे. या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक ...
' आर्त' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
राजेंद्र जी.साळी लिखित, दिग्दर्शित 'आर्त' चित्रपटाच्या माध्यमातून जातपंचायत या व्यवस्थेवर कटाक्ष टाकण्यात आला आहे. या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच अ.नि.सच्या मुक्ता दाभोळकर यांच्या हस्ते मुंबईत मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी मुक्ता दाभोळकर म्हणाल्या की, 'आर्त' चित्रपटाच्या सर्व टीमचे अभिनंदन करते कारण त्यांनी इतका मोठा आणि गंभीर विषय हाताळला, जातपंचायत फक्त अशिक्षित आणि आदिवासी समाजातच आहे असं नाही, तर सुशिक्षित समाजातही याचे प्रमाण मोठे आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं अनेक वर्ष जातपंचायतीच्या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध लढा पुकारल्यानंतर आज महाराष्ट्रात जातपंचायतीवर कायदा करण्यासाठी आंदोलन उभं होत असतांना, आर्त सारख्या चित्रपटातून या विषयाला लोकांपर्यंत पोहचवणे म्हणजे धाडसाचे काम आहे. यावेळी चित्रपटातील शीतल साळुंके, गणेश यादव, जयराज नायर, संतोष मयेकर, अजित सावंत, अजित भगत आदी कलाकार देखील उपस्थित होते.'आर्त' हा चित्रपट येत्या २० मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.