Join us

अखेर सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 14:27 IST

सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni)ने ७ मे रोजी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी लंडनमध्ये पती कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) सोबत पुन्हा लग्नगाठ बांधली होती.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अप्सरा सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni)ने ७ मे रोजी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी लंडनमध्ये पती कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) सोबत पुन्हा लग्नगाठ बांधली. तिच्या या दुसऱ्या लग्नाची उत्सुकता चाहत्यांमध्ये खूप होती. मात्र या लग्नाचे फोटो किंवा व्हिडीओ सोनालीने सोशल मीडियावर शेअर केले नव्हते. मात्र आता तिच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

कुटुंबियांच्या अनुपस्थितीत दुबईला ७ मे २०२१ रोजी सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांनी रजिस्टर पद्धतीने विवाह केला होता. त्यांच्या लग्नाला घरातल्या मंडळींनी ऑनलाइन हजेरी लावून आशीर्वाद दिला होता. दोन वेळेस त्यांनी लग्नाची तारीख ठरवली होती मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे लग्न पुढे ढकलण्यात आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र आपल्या लग्नात राहून गेलेल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून तिने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातला. हळद, मेहेंदी सोहळा, संगीत सोहळा या सर्वांचा तिला अनुभव घ्यायचा होता लग्नातली राहून गेलेली हौस तिला पूर्ण करायची होती आणि म्हणूनच तिने कुणाल सोबत लग्न केले. यावेळी सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना तिने निमंत्रित केले होते. मात्र या सोहळ्याचे क्षण व्हायरल करण्यास तिने मनाई केली होती. लंडनला पार पडलेल्या तिच्या लग्नात प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर या कपलने हजेरी लावली होती. 

सोनालीने दुसऱ्यांदा लग्न झाले मात्र तिने लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर का प्रसिद्ध केले नाही असे तिला चाहते विचारत होते. तेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी ते प्रसिद्ध करेन असे तिने तिच्या चाहत्यांना आवाहन केले होते. ११ ऑगस्ट रोजी प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सोनालीच्या लग्नाचे खास क्षण तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत.

७ मे २०२२ ते ११ ऑगस्ट २०२२ या काळात राखून ठेवलेले क्षण असे म्हणत तिने आपल्या सप्तपदी , कुणालच्या हातात हात घेतलेला फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. या फोटोमध्ये सोनसळी हिरव्या रंगाचे पैठणी नेसलेली पहायला मिळत आहे. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे क्षण पाहण्यासाठी तिचे चाहते देखील निश्चितच उत्सुक असतील. ११ ऑगस्ट रोजी हे क्षण प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

टॅग्स :सोनाली कुलकर्णी