नाटकांची पन्नाशी पूर्ण- विजय पटवर्धन यांनी केला अनोखा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 16:21 IST
मालिका, नाटकं, चित्रपट अशा माध्यमातून मुशाफिरी करत अभिनेता, लेखक, आणि दिग्दर्शक अशी कारकीर्द गाजवणार बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे विजय पटवर्धन. ...
नाटकांची पन्नाशी पूर्ण- विजय पटवर्धन यांनी केला अनोखा विक्रम
मालिका, नाटकं, चित्रपट अशा माध्यमातून मुशाफिरी करत अभिनेता, लेखक, आणि दिग्दर्शक अशी कारकीर्द गाजवणार बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे विजय पटवर्धन. व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकांची पन्नाशी पूर्ण करत विजय पटवर्धन यांनी अनोखा विक्रम केला आहे. मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्यकृती असलेल्या ती फुलराणी या नाटकाने विजय पटवर्धन यांनी रंगभूमीवरील आपल्या नाटकांची पन्नाशी पूर्ण केली. ३ सप्टेंबर १९९२ ला कुर्यात पुन्हा टिंगलम या नाटकाने श्रीगणेशा करणाऱ्या विजय पटवर्धन यांची सध्या व्यक्ती आणि वल्ली व ती फुलराणी ही नाटके चालू आहेत. पु.लं देशपांडे यांच्यासारख्या मोठ्या साहित्यिकाच्या ती फुलराणी या नाटकाने माझ्या नाटकाची पन्नाशी पूर्ण व्हावी हे माझ्यासाठी भाग्याचं असल्याचं सांगत आपल्या पुढील वाटचालीसाठी व नव्या विक्रमासाठी विजय पटवर्धन नव्या जोमाने सज्ज आहेत.सध्या सर्वत्र ती फुलराणीचे जोरदार प्रयोग सुरु आहेत. या नव्या संचातल्या सर्वच कलाकारांच्या अभिनयाच प्रेक्षकांकडून कौतुक होतयं. आपल्या अभिनयाने लिखाणाने व दिग्दर्शनाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या विजय पटवर्धन या हरहुन्नरी कलाकाराच्या नाटकाची पन्नाशी व त्यांनी त्याची ठेवलेली नोंद हे निश्चितचं गौरवास्पद आहे.