Join us

कॉमेडी अॅवॉर्डसचा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 15:57 IST

                 झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सचा’ सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी हटके कलाविष्कारांची मेजवानी असते. यंदाच्या सोहळ्यातही एक ...

                 झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सचा सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी हटके कलाविष्कारांची मेजवानी असते. यंदाच्या सोहळ्यातही एक से बढकर एक कलाविष्कार सादर झाले. यावर्षी कल आज और कल’ अशी हटके थीम घेऊन हा सोहळा रंगला. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत रंगलेल्या झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सचा’ सोहळ्याची रंगत रविवार २४ जुलै सायंकाळी ६.३० वा. झी टॉकीजवर पहायला मिळणार आहे.           उर्मिला कानेटकर हिच्या गणेश वंदनेने या पुरस्कार सोहळ्याची शानदार सुरुवात झाली. ‘कल आज और कल’ या थीम नुसार  जुन्या व नव्या गीतांवर मानसी नाईक, वैभव तत्ववादी, पूजा सावंत यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मानसी नाईकचा ‘ग्लॅम डान्स’ या सोहळ्यातील खास आकर्षण ठरला. सागर कारंडे, प्रियदर्शन जाधव, भूषण कडू, कुशल बद्रिके, विनीत भोंडे, अतुल तोडणकर, प्राजक्ता हनमघर, रमेश वाणी यांच्या ‘सैराट २’ प्रहसनाने सोहळ्यात चांगलीच रंगत आणली. संतोष पवार, विशाखा सुभेदार, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, विनीत भोंडे यांनी सादर केलेलं ‘बाजीराव – मस्तानी’ या प्रहसनाने हास्याचा बार उडवून दिला. अतुल तोडणकर, संतोष पवार, श्रेया बुगडे, अभिजीत केळकर, नम्रता आवटे, रमेश वाणी या कलाकारांनी  सादर केलेली ‘सात्विक बार’ ही नाटिका ही भन्नाट होती. समीर चौघुले, सागर कारंडे, भूषण कडू, अतुल तोडणकर, प्राजक्ता हनमघर, प्रियदर्शन जाधव, यांनी सादर केलेल्या ‘नाकाबंदी’ या प्रहसनाने ही चांगलंच मनोरजंन केलं. याशिवाय सर्वात धमाल आणली ती भाऊ कदम यांच्या अभिनेता ‘मेहमूद’ यांच्या स्कीटने तसेच भाऊ कदम, विशाखा सुभेदार, अभिजीत केळकर, समीर चौघुले यांनी मेहमूद यांच्या विविध गाण्यांवर धरलेल्या ठेक्याने.         मोहन जोशी, पुष्कर क्षोत्री, क्रांती रेडकर, प्रथमेश परब यांचं धम्माल निवेदन, प्रत्येक पुरस्कारागणिक वाढत जाणारी उत्कंठा, मंचावर सादर होणाऱ्या एकापेक्षा एक बहारदार कलाविष्कारांनी झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सची रंगत चांगलीच वाढवली. मनोरंजन क्षेत्रातील विनोदी कलावंताच्या कार्याची दखल घेणारा झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सचा हा शानदार सोहळा रविवारी २४ जुलैला सायंकाळी ६.३० वा. झी टॉकीजवर प्रसारित होणार आहे.