बेनझीर जमादार
मला सासू हवी या मालिकेतील अभिनेत्री दिप्ती देवी ही लवकरच एका जाहिरातीत झळकणार आहे. या जाहिरातीत तिच्यासोबत बॉलिवुड अभिनेता नरेंद्र सक्सेना पाहायला मिळणार आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून एक छान अनुभव मिळाला असल्याचे दिप्तीचे म्हणणे आहे. जाहिरातीत खूप कमी वेळात तुमचे अभिनयाचे कौशल्य दाखवायचे असते त्यामुळे ते सगळ्यात जास्त आव्हानात्मक असल्याचे दिप्तीला वाटते. आपल्याला एकाच भूमिकेत अडकायचे नसल्याचे दिप्तीने सीएनएक्सशी बोलताना सांगितले आहे. मी नेहमीच काही ना काही वेगळे करण्याचा प्रयत्न करत असते. मालिका, लघुपट, चित्रपट, जाहिरात अशा विविध माध्यमांतून दिप्ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भविष्यात दिप्तीला योद्ध्याची आणि खेळाडूची भूमिका साकारायची आहे. हे स्वप्न नक्की पूर्ण होईल असा आत्मविश्वास देखील दिप्तीला आहे.