Join us

Exclusive सोनालीला आवडतो हॉट लुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 13:07 IST

 प्रियांका लोंढे          तुझे ढुंढता हुँ मै हर कही... या गाण्यात सैफअली खान सोबत ठुमके ...

 प्रियांका लोंढे          तुझे ढुंढता हुँ मै हर कही... या गाण्यात सैफअली खान सोबत ठुमके लावलेली सोनाली कुलकर्णी आजही प्रेक्षकांच्या मनात आहे.  बॉलिवुडमध्ये आपल्या अभिनयाची जादु दाखविल्यानंतर सोनालीने बरेच दर्जेदार मराठी सिनेमे केले. मध्यंतरी सोनालीच्या  डॉ. प्रकाश बाबा आमटे, या चित्रपटाचे सर्वांनीच कौतुक केले. परंतू या चित्रपटामध्ये सोनालीचे चांगलेच वजन वाढल्याचे दिसुन आले होते. पण आता सोनाली खुपच स्लिम स्ट्रीम झाली असून ती वेगळ््या हेअरस्टाईलमध्ये पहायला मिळत आहे. सोनालीने केलेल्या या मेकओव्हर विषयी तिने सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी उलगडल्या.           मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात नेहमीच वेगळे रहायला आवडते. कपडे, मेकअप, हेअरस्टाईल या गोष्टींवर मी सतत वेगवेगळे प्रयोग करीत असते. एकसारख्या लुक मध्ये प्रेक्षकांच्या समोर येणे मला कंटाळवाने वाटते.  मेकओव्हरमुळे तुमच्या व्यक्तिमत्वात खुपच फरक पडतो. मी आताच एक मस्त हेअरकट केला आहे.  चित्रपटांमधील माझा लुक आणि वैयक्तिक आयुष्यातील मी वेगळी आहे. आजपर्यंत मी अनेक चित्रपट केले. माझ्या प्रत्येक चित्रपटातील भुमिकांचे प्रेक्षकांनी, मित्रमैत्रिणींनी कौतुक केले. पण मला जर कोणी माझ्या लुक विषयी बोलले की तु खुप सुंदर दिसतेस, तुझा हेअरकट मस्त आहे, तु या लुकमध्ये हॉट दिसतेस. तर खरच लाजही वाटते आणि अशा कॉमप्लिमेंट्स मिळाल्याने आनंदही होतो. मला कोणी हॉट म्हटले तर मला आवडतेच. बदलत्या काळानूसार फॅशनेबल राहण्याचा मी प्रयत्न करते. सोनालीच्या या झक्कास हेअरकटला मात्र सोशल मिडियावर अनेक लाईक्स मिळत आहेत.