Join us

Exclusive बर्फाच्छादित लेहमध्ये सईचे शुटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 13:23 IST

 प्रियांका लोंढे                         लेह-लडाखच्या सुंदर अ‍ॅटमॉस्पिअरमध्ये जाऊन हॉलिडे ...

 प्रियांका लोंढे                         लेह-लडाखच्या सुंदर अ‍ॅटमॉस्पिअरमध्ये जाऊन हॉलिडे एंजॉय करण्याची इच्छा कोणाला होणार नाही. सुंदर रोमँटिक वातारणात जर आपल्याला अशा बर्फाच्छादीत प्रदेशात जाण्याची संधी मिळाली तर मग काय विचारुच नका. अशीच अपॉरच्युनिटी मिळाली होती आपल्या बोल्ड अ‍ॅन्ड ब्युटिफुल सई ताम्हणकरला.  सई नूकतीच लेह ला जाऊन खुप धमाल मस्ती करुन आलीये. आता तुम्ही म्हणाल की सई मस्त हॉलिडे करण्यासाठी लेहला गेली होती का तर तसे नाहीये. सई एका आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी लेहच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत होती. याबद्दल सीएनएक्सा दिलेल्या खास मुलाखतीमध्ये तीने या मेमोरेबल ट्रीपचे अनेक पैलु उलगडले. सई म्हणाली. मी गजेंद्र अहिरे यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रकरणासाठी लेहला गेले होते. ते ठिकाण ऐवढे सुंदर आहे की तुम्ही लेहच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. जिकडे पहावे तिकडे तुम्हाला बर्फ, हिमालय अन पहाडच पहाड दिसतात. ते पाहिल्यावर आपल्या देशातही असे निसर्गसौंदर्य आहे याचा गर्व वाटतो. तो अप्रतिम परिसर पाहिल्यावर रस्त्यावर कचरा टाकतानी तुम्ही दहा वेळा विचार कराल कारण एवढी सुंदर जागा घाण करण्याचा विचारच आपल्या मनात येत नाही. आम्ही शुटिंगच्या वेळी खुपच मजा अन धमाल केली. दहा दिवसांच्या लेहच्या या शुटिंगचे दिवस खरच मेमोरेबल होते. सईच्या फोटोजकडे पाहुन तिने किती ऐजॉय केला हे आपल्याला समजतेच. गजेंद्र आहिरे यांच्या या अनटायटल फिल्म मध्ये राजेश शृंगारपुरे आपल्याला सईच्या अपोझिट पहायला मिळणार आहे.