Join us

Exclusive ​: प्रिया होतेय सोशलमीडियावर हिट... ६ लाख फॉलोवर्स असणारी पहिली मराठी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2016 14:04 IST

 priyanka londhe       आजकाल सोशलमीडीयावर कोणाला किती लाईक्स मिळतात आणि किती फॉलोअर्स आहेत, यावरुनच समोरच्या व्यक्तीचे स्टेटस ठरविले ...

 priyanka londhe       आजकाल सोशलमीडीयावर कोणाला किती लाईक्स मिळतात आणि किती फॉलोअर्स आहेत, यावरुनच समोरच्या व्यक्तीचे स्टेटस ठरविले जात आहे. एखादा फोटो अपलोड केल्यावर जर हजारो लाईक्स आल्या तरच तुम्ही सोशल साईट्सवर हिट आहात असे समजले जाते. कलाकारांचे मात्र आजकाल हजारो-लाखो फॉलोअर्स सोशल साईट्सवर असल्याचे दिसते. आता हेच पाहा ना, आपली मराठी इंडस्ट्रीची चुलबुली गर्ल प्रिया बापटचे देखील सोशलमीडियावर असेच चाहते आहेत. नुकतेच प्रियाचे इन्स्टाग्रामवर ६ लाख फॉलोवर्स झाल्याचे समजले आहे. प्रियाचा वजनदार हा चित्रपट नुकताच बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरला आहे. सहज सुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांना घायाळ करणारी प्रिया आता सोशलमिडियावर देखील नेटिझन्सना भूरळ पाडून यंगिस्तानमध्ये सुपरहिट झाल्याचे दिसून येत आहे. अहो एवढेच नाही तर मराठी चित्रपसृष्टीतील ६ लाख फॉलोवर्सचा टप्पा पार करणारी प्रिया पहिलीच अभिनेत्री झाली आहे. तर प्रियाच्या, प्रिया बापट फॅन क्लब या पेजला देखील २.४ मिलेनिअर फॉलोअर्स आहेत. त्यामुळे प्रियाचे फेसबुक अकाऊंट आणि फॅन पेज देखील फेसबुक कडून व्हेरीफाय करण्यात आले आहेत. सध्या फेसबुकवर अनेक कलाकारांच्या नावाने फेक अकाऊंट्स ओपन केली जात आहेत. त्यामुळे प्रियाची सोशल मिडियावरील क्रेझ पाहता मराठी चित्रपटसृष्टीतील एखादया सेलिब्रिटीचे फॅन फेज फेसबुककडून व्हेरीफाय करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नुकतीच प्रिया फेसबुकच्या मुंबईतील आॅफिसला भेट देऊन आली आहे. फेसबुक आॅफिसला भेट देण्याचा माझा अनूभव फारच छान होता. तिथल्या काही लोकांशी माझी मिटींग देखील झाली. यावेळी आम्ही अनेक प्रश्नांवर चर्चा केली. सोशलमीडियावर चाहत्यांशी जास्त कनेक्ट कसे राहता येईल हे देखील त्यांनी मला सांगितले. या गोष्टीचा प्रियाने लोकमत सीएनएक्सशी मनमोकळ््या गप्पा मारताना उलगडा केला.