Join us

Exclusive बघतोस काय मुजरा कर... झाला लंडनमध्ये शुट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 16:30 IST

 प्रियांका लोंढे                               गार्डन, चाळ्ींमधील घरे, ...

 प्रियांका लोंढे                               गार्डन, चाळ्ींमधील घरे, चहाची टपरी, मोजके बंगले, अशी काही लोकेशन्स आपल्याला मराठी चित्रपटांमध्ये सर्रास पहायला मिळतात. काहीवेळेस कमी बजेट असल्याने दिग्दर्शकांना हवी ती चित्रीकरण स्थळे मिळत नसल्याचेही बोलले जाते. पण आता मराठी सिनेमा जागतिक पातळीवर पोहचला असून सिनेमावाले पण थेट परदेशात चित्रपट शुट करू लागले आहेत.   आता हेच पहा ना हेमंत ढोमे त्याच्या आगामी चित्रपटासाठी थेट पोहचला लंडनला. बघतोस काय मुजरा कर हा चित्रपट हेमंत दिग्दर्शित करीत आहे. या सिनेमाचे शुटिंग सातारा, मुंबईमध्ये झाले असून काही सीन्सचे चित्रीकरण लंडनमध्ये करण्यात आले आहे. याबाबत हेमंतने सीएनएक्सला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत लंडनमधील शुटचा अनूभव सांगितला. चित्रपटाची कथा लिहितानाच त्यामध्ये लंडनचा उल्लेख होता. त्यामुळे लंडनशिवाय चित्रीकरण पुर्ण होऊच शकत नव्हते. मी लंडनमध्ये शिक्षणासाठी राहिलो असल्याने तिथल्या अनेक गोष्टींची,लोकेशन्सची मला माहिती होती. लंडनमधील आकर्षक पर्यटन स्थळे, मुख्य शहरातील काही गोष्टी योग्य पद्धतीने कॅमेरामध्ये बंदिस्त करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टांकसाळे या तिघांचे काही सीन्स आणि एक गाणे लंडनमध्ये शुट करण्यात आले आहे. ड्रोन कॅमेरे आणि लेटेस्ट टेक्निकचा वापर आम्ही  लंडनमधील शुटिंगसाठी केला आहे. या चित्रपटाचे संपुर्ण चित्रीकरण पुर्ण झाले असून सध्या एडिटींगचे काम सुरु आहे. लवकरच चित्रपट प्रदर्शनाची तारीख आम्ही सांगणार आहोत. लंडनमधील अप्रतिम लोकेशन्स जर पहायची असतील तर बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.