प्रियांका लोंढे
बॉलिवुडची मस्तानी दिपिका पादुकोन आणि स्माईल क्वीन रेणुका शहाणे लवकरच आपल्याला एकत्र पहायला मिळणार आहेत. आता तुम्हाला वाटले असेल की या दोघी आपल्याला चित्रपटात एकत्र दिसतील का? तर तसे बिलकुलच नाहीये. दिपिका आणि रेणुका आपल्याला लवकरच एका जाहितातीत दिसणार आहेत. याविषयी रेणुकाने सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, दिपिका सोबत मी एका जाहिरातीमध्ये काम केले आहे. आपल्याकडे आता सणांना सुरुवात होईल आणि रक्षाबंधनच्या माहोलमध्येच ही जाहिरात कदाचित प्रेक्षकांसमोर येईल. तर दिपिका सोबत काम करण्याचा अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, दिपिकाचे खरच मला खुप कौतुक वाटते. ती एकदम बॅलन्स मुलगी आहे. ओम शांती ओम चित्रपटानंतर तिची खुपच ग्रोथ झाली आहे. सेटवर देखील ती सगळ््यांशी मस्त वागते. या जाहिरातीमध्ये एकत्र काम करताना आम्हाला खुपच मजा आली. मी बºयाच दिवसांनंतर कोणत्या तरी बॉलिवुड कलाकारा सोबत या जाहिरातीच्या निमित्ताने काम केले आहे. दिपिकाचे वडिल प्रकाश पादुकोन यांचे मी आणि माझी आई जबरदस्त चाहते आहोत. त्यांच्या मुलीसोबत मला काम करायचा योग आल्याने छान वाटले. एखादी चांगली कथा आली तर बॉलिवुड सिनेमात देखील मला दिपिका सोबत काम करायला नक्कीच आवडेल. आता आपल्याला जर या दोघींची मेहमान नवाजी पहायची असेल तर रक्षाबंधनची वाट पहावी लागणार आहे.
"Mehmaan-nawaazi" of a unique kind with the gorgeous @deepikapadukone