Exclusive आदिनाथचे गुपित उलगडले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 14:39 IST
प्रियांका लोंढे मराठी इंडस्ट्रीचा हॅन्डसम हंक म्हणुन ओळखल्या जाणाºया आदिनाथ कोठारेचे गुपित आज ...
Exclusive आदिनाथचे गुपित उलगडले....
प्रियांका लोंढे मराठी इंडस्ट्रीचा हॅन्डसम हंक म्हणुन ओळखल्या जाणाºया आदिनाथ कोठारेचे गुपित आज उलगडले आहे. आता तुम्ही म्हणाल आदिनाथने अशी काय गोष्ट एवढ्या दिवस लपवली होती की ती आता सर्वांच्याच समोर आली आहे, तर आदिनाथचे हे गुपित अन सिक्रेट सरप्राईज त्याच्या चाहत्यांच्या चेहरºयावर हसु खुलवणारे आहे. आदिनाथ हा एक चांगला अभिनेता आहे, मस्त डान्स करतो अन आता तर तो डिरेक्शनमध्ये देखील येत आहे या सर्व गोष्टी तर तुम्हाला माहितच आहेत परंतू याही पलीकडे जाऊन आदिनाथ हा एक उत्तम कवी आहे हे आत्तापर्यंत कोणालाच माहित नव्हते. सीएनएक्सच्या माध्यमातून आपल्या या अभिनेत्याचे हे हाईड सिक्रे ट आज प्रथमच सर्वांच्या समोर येत आहे. आदिनाथला या बद्दल विचारले असतो तो म्हणाला, हो मी कविता करतो. २०१२ सालापासुनच मी लिहायला लागलो. खरतर माझाच माझ्यावर विश्वास बसत नाही कारण माझे शिक्षण संपुर्ण इंग्रजी माध्यामातून झाले आहे. पण जेव्हा मी अभिनय करायला लागलो तेव्हा मराठी भाषा, साहित्याशी माझा संपर्क वाढला अन त्याच दरम्यान काही साहित्यिक मित्रांशी गट्टी जमली अन मला या सर्व गोष्टींची आवड झाली. पु.ल देशपांडे, अनिल बर्वे, किशोर कदम हे माझे आवडते कवी आहेत. किशोर कदम यांचा तर मी एवढा चाहता आहे की त्यांना नेहमी कविता ऐकवायला सांगतो. मला लिहायला फारच आवडते. लिखाणाच्या माध्यामातून स्वत:च्या फिलिंग एक्सप्रेस करता येतात. आता आदिनाथच्या या अप्रतिम कविता आपल्याला कोणत्या चित्रपटांच्या गाण्यांमध्ये ऐकायला मिळतात का याची तुर्तास तरी आपण प्रतिक्षाच करुयात. अन कवी म्हणुन पुढील वाटचालीस आदिनाथला सीएनएक्सकडुनही खुप साºया शुभेच्छा. पण तोपर्यंत खास आदिनाथच्या चाहत्यांसाठी त्याची ही अप्रतिम कविता