Join us

Exclusive रेडिमिक्सच्या लुकमध्ये प्रार्थनाला आली मजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 18:57 IST

 प्रियांका लोंढे                कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस सदाचारी, मितवा ...

 प्रियांका लोंढे                कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस सदाचारी, मितवा या  चित्रपटांमध्ये एकदमच ग्लॅमरस अंदाजात प्रार्थना बेहेरे प्रेक्षकांना दिसली. चित्रपट आणि मालिकांमधून आज घराघरात पोहचलेली प्रार्थना प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ती आगामी चित्रपटात एकदमच वेगळ््या लुकमध्ये तिच्या चाहत्यां समोर येणार आहे. जालिंधर कुंभार दिग्दर्शित रेडिमिक्स या सिनेमामध्ये प्रार्थना आपल्याला सिंपल लुकमध्ये दिसणार आहे. कुरळे केस आणि डोळ््यावर भला मोठा चष्मा असलेली प्रार्थना यामध्ये वैभव तत्ववादी सोबत  झळकणार आहे. प्रार्थनाने तिच्या या लुकविषयी सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा केला. मला खरतर असे सिंपलच रहायला जास्त आवडते. मी अतापर्यंत जे चित्रपट केले त्यामध्ये मला खुपच मेकअप असलेल्या ग्लॅमरस भुमिका करायला मिळाल्या होत्या. पण पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये माझा रोल चाळीमध्ये राहणाºया मुलीचा असल्याने त्या मालिकेत मला साधी लिपस्टीकही वापरता आली नाही. आणि मला अशाच साध्या पद्धतीने रहायला आवडते.               रेडिमिक्स या सिनेमात देखील मी एकदमच सिंपल राहणारी मुलगी असते. ज्या मुलीला स्वत:कडे पहायला सुद्धा वेळ नसतो. कुरळे केस आणि डोळ््यावर मोठा चष्मा अशा लुकमध्ये मी रेडिमिक्स सिनेमात  तुम्हाला दिसेल. मला तो लुक कॅरी करायला खुपच छान वाटले, खरतर मज्जा आली. मला जास्त मेकअप करायला किंवा सजायला बिलकुलच आवडत नाही. मी आॅफ कॅमेरा देखील साधीच राहते. मला जर कोणी सिंपल लुकमध्ये पाहिले तर त्यांना प्रश्न पडतो मी खरच हिरोईन आहे का ? या चित्रपटात नेहा जोशीने प्रार्थनाच्या बहिणीचा रोल केला आहे. ही  पुण्यात घडणाही गोष्ट असून एक वेगळी प्रेमकथा आहे .हा चित्रपट तयार आहे फक्त आता तो केव्हा प्रदर्शित करणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.