‘दुर्गा’ लघुपटाचा ट्रेलर उलगडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 19:34 IST
होली बेसिल प्रॉडक्शन हॉऊसचे विवेक कजारिया यांनी नवलखा यांनी नवलखा आसोबत उत्कृष्ट मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे.
‘दुर्गा’ लघुपटाचा ट्रेलर उलगडला
होली बेसिल प्रॉडक्शन हॉऊसचे विवेक कजारिया यांनी नवलखा आसोबत उत्कृष्ट मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे.सिनेक्षेत्रात नेहमी नवनवे प्रयोग करणारे निर्माते विवेक कजारिया यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलंय. त्यांनी एक लघुपट दिग्दर्शित केला आहे. ‘दुर्गा’ असं या लघुपटाचं नाव असून त्याचा ट्रेलर नुकताच उलगडला आहे. आजोबा आणि नातीचे भावविश्व आणि गावातील एका कुशल मुर्तीकार ज्याची दुर्गा देवीवर अढळ श्रद्धा अशा व्यक्तीच्या जीवनाचा आढावा या लघुपटाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. ‘दुर्गा’ या लघुपटाचा वर्ल्ड प्रिमियर कोरिया येथे बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रथमच करण्यात आला. अभिनेत्री वीणा जामकर, बालकलाकार साची आणि कल्याण चॅटर्जी यांच्या लघुपटात प्रमुख भूमिका आहेत.