मराठी चित्रपटात डायलॉग, गाणी, अॅक्शन, रोमान्स या सर्व गोष्टी प्रेक्षकांनी आतापर्यत अनुभवल्या आहेत. पण विजय मौर्य दिग्दर्शित फोटोकॉपी या चित्रपटात प्रेक्षकांना कवितांचा आनंद लुटता येणार आहे. किल्ला या चित्रपटानंतर पहिल्यांदाच फोटोकॉपी या चित्रपटात कवितांचा समावेश करण्यात आले असल्याचे चित्रपटाची निर्माती नेहा राजपाल यांनी लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. नेहा सांगते, साधारण चार ते पाच कविता या चित्रपटात आहेत. खरं सांगू का, गायक हे कवितांमुळेच घडले आहेत. पण आजकालची पिढी ही कवितांपासून दुरावली आहे. म्हणून या पिढीला कवितांच्या जवळ आणण्याचे काम हा चित्रपट करणार आहे. त्यामुळे या चित्रपटातील अभिनेता व अभिनेत्री यांचे मन कवितांमुळे जुळली असल्याचे दाखविण्यात आले आहेत. तसेच डायलॉग कमी व कवितांच्या माध्यमातून या जोडीचा संवाद साधला आहे. या कविता मंदार चोळकर यांनी लिहिल्या असून, याचे श्रेय देखील मंदार यांना देण्यात आले आहे. चित्रपटस सृष्टीत पहिल्यांदा चित्रपटाच्या सुरूवातीला कविता व त्याचे श्रेय देण्याची पाटी झळकणार असल्याचे देखील नेहाने यावेळी सांगितले आहे.
मनं जुळली कवितांमुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 16:14 IST