‘राजा शिवछत्रपतीं’ ची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे प्रेक्षक नेहमी आदराने पाहतो. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘रमा माधव’ चित्रपटामध्ये त्यांनी ‘सदाशिवराव भाऊ’ यांची भूमिका साकारली होती. आता परत एकदा त्यांना सदाशिवभाऊंच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
डॉ. अमोल कोल्हे हे ज्या संधीच्या शोधात होते ती संधी त्यांच्यासमोर आव्हानात्मक रुपात मिळाली आहे. ‘पानिपत’ चा इतिहास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवयाला लवकरच मिळणार आहे. ‘पानिपत’ चित्रपटामध्ये डॉ. अमोल कोल्हे ‘सदाशिवराव भाऊं’ ची भूमिका साकारणार आहेत. अमोल कोल्हेंचं ऐतिहासिक दृश्य आणि त्यांच्या अभिनयातील चमक लवकरच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल.