Join us

पूजाने कुणाला दिले जीवनदान ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 15:40 IST

           अभिनेत्री पूजा सावंतने अनेक मराठी चित्रपटातून तिच्या अभिनयाची चुणूक दाखविलीच आहे. पुजाला सामाजिक ...

 
          अभिनेत्री पूजा सावंतने अनेक मराठी चित्रपटातून तिच्या अभिनयाची चुणूक दाखविलीच आहे. पुजाला सामाजिक कार्य करण्याची ही आवड आहे. एवढेच नाही तर तिला रस्त्यांवरील कुत्र्यांविषयी जरा जास्तच आपुलकी आहे. पूजा आणि तिची बहिण दोघींनीही अनेक रस्त्यांवरील कुत्री सांभाळली आहेत. आता तर तिने चक्क रस्त्यावरील एका छोट्या कुत्र्याला घरीच आणले आहे. अनाथ कुत्र्याला पूजाना आपलेसे केले आहे. गटारात पडलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला पूजाच्या भावाने पाहिले, आणि त्याने त्या छोट्याशा पिल्लाला घरी आणले. गटारात पडल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली होती. पूजाने त्या कुत्र्याच्या पिल्लाला पाहिल्यावरच त्याला घरी ठेवण्याचा निर्णय घेतला. पूजा एवढ्यावरच थांबली नाही तर तिने त्या कुत्र्याला दवाखान्यात नेले. त्याच्यावर योग्य ते उपचार केले. त्यानंतर आता कुठे ते पिल्लु पूजाच्या घरत मस्त रुळले आहे. पूजाने नेहमीच रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांना आपलेसे केले आहे. त्याची काळजी घेतली आहे. त्यांच्यासाठी ती खायलाही घेऊन जाते. काही दिवसांपुर्वी पूजा आणि तिच्या बहिणीने दादर ते माहिम रस्त्यावरील कुत्र्यांसाठी डॉग फूड नेले होते. प्रत्येक कुत्र्याला तिने ते खाऊ घातले. असे ती नेहमीच करीत असल्याचे पूजाना लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. मुक्या प्राण्यांवर दया करा असे फक्त बोललेच जाते. परंतु पूजाने ते सत्यात उतरवून दाखविले आहे. आपण सर्रास पाहतो की सेलिब्रिटीजकडे एकदम मस्त दिसणारे, महागडी कुत्री असतात. परंतु अशा रस्त्यांवरील प्राण्यांवर प्रेम करणार खरेच कमी लोक असतात.