Join us
Daily Top 2Weekly Top 5

डबिंग न करता बनवला लघुपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 14:39 IST

             डोंबिवली फास्ट, श्वास, ट्रॅफिक सिग्नल, गैर यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्यानंतर अभिनेता ...

 
            डोंबिवली फास्ट, श्वास, ट्रॅफिक सिग्नल, गैर यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्यानंतर अभिनेता संदीप कुलकर्णी आता लघुपटात झळकणार आहे. ५ स्केचेस नावाच्या हिंदी लघुपटात प्रेक्षकांना एक रहस्यकथा पाहायला मिळणार आहे. आकाश, माया आणि त्यांची मुलगी चित्रा या तीन पात्रांभोवती एक रहस्य गुंफण्यात आले आहे. संदीपने या लघुपटात आकाश या प्रमुख पात्राची भूमिका साकारली आहे. या लघुपटाविषयी बोलताना संदीप सांगतो, "हा लघुपट जागतिक प्रेक्षकांशी नाते जोडणारा आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात डबिंग केलेले नाही तर प्रसंग चित्रीत करतानाच संवाद रेकॉर्ड केले आहेत. सिंक साऊंड या अत्याधुनिक तंत्राचा वापर करणे हे अतिशय कौशल्याचे आणि मेहनतीचे काम आहे. पण यामुळे अभिनयाला संवादाची जोड मिळून उत्तम परिणाम साधला गेला आहे. आतापर्यंत दहा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी हा लघुपट पाठवण्यात आला आहे."