Join us

अशोक सराफ यांचं खरं नाव माहित्येय का?, खुद्द निवेदिता सराफ यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 06:00 IST

Ashok Saraf And Nivedita Saraf : निवेदिता सराफ यांनी एका मुलाखतीत अशोक सराफ यांच्या नावाचा किस्सा सांगितला आहे.

अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. या कपलबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. तसेच बऱ्याचदा अशोक सराफ यांच्याबद्दल अनेक किस्से ऐकायला आणि वाचायला मिळत असतात. निवेदिता सराफ सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि त्या या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतात. दरम्यान निवेदिता सराफ यांनी एका मुलाखतीत अशोक सराफ यांच्या नावाचा किस्सा सांगितला आहे.

निवेदिता सराफ यांनी सांगितले की, अशोक सराफ यांचे खरं नाव अशोक कुमार आहे. अशोकच्या मोठ्या बहिणीला अभिनेते अशोक कुमार खूप आवडायचे. म्हणून त्यांनी माझ्या नवऱ्याचे नाव अशोक ठेवले होते. मात्र त्यांचे खरे नाव अशोक कुमारच आहे.

निवेदिता आणि अशोक सराफ यांची लव्हस्टोरी

अशोक सराफ आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली होती. निवेदिता जोशी आणि अशोक सराफ यांची मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांचे प्रेम जुळले. अशोक सराफ यांना त्यांनी प्रपोज देखील केलं. त्यानंतर १९९० साली गोव्यातील मंगेशी मंदिरात निवेदिता आणि अशोक सराफ यांनी लग्न केले. खूप कमी लोकांना माहित आहे की या जोडप्याच्या वयात १८ वर्षांचे अंतर आहे, परंतु त्यांच्यासाठी वय फक्त एक आकडा आहे. दोघांमधील बंध दिवसेंदिवस घट्ट होत गेले. निवेदिता यांचा जन्म १९६५ मध्ये झाला आणि अशोक सराफ यांचा जन्म १९४७ मध्ये झाला. निवेदिता आणि अशोक सराफ गेल्या अनेक दशकांपासून आनंदी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. या जोडप्याला अनिकेत नावाचा मुलगा देखील आहे, जो एक प्रोफेशनल शेफ आहे.

टॅग्स :अशोक सराफनिवेदिता सराफ