Join us  

प्राजक्ता माळीचं शाळेतील टोपणनाव माहितीये का? 'या' बॉलिवूड सिनेमावरुन चिडवायची मुले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 6:15 PM

Prajakta mali: शाळेत असताना एका बॉलिवूड गाण्यावर डान्स केल्यानंतर प्राजक्ताला हे नाव मिळालं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (prajakta mali). आपल्या मनमोहक सौंदर्य आणि दिलखेचक अदांमुळे प्राजक्ताने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं. उत्तम अभिनय आणि तितकाच आत्मविश्वास यांच्या जोरावर प्राजक्ता लोकप्रिय होत आहे. त्यामुळे तिच्याविषयीची प्रत्येक गोष्ट चर्चिली जाते. यात सध्या प्राजक्ताच्या बालपणीचा किस्सा चर्चिला जात आहे. प्राजक्ताला शाळेत असताना एका खास टोपणनावाने शाळेतली मुलं चिडवायची. एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने या गोष्टीचा खुलासा केला.

लहान असल्यापासून प्राजक्ताला नृत्य आणि अभिनयाची आवड होती. त्यामुळे शाळेत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात ती कायम सहभाग घ्यायची. एकदा शाळेत असताना तिने  देवदास या सिनेमातील गाण्यावर डान्स केला होता. हा डान्स तिने स्वत: बसवला होता. विशेष म्हणजे या गाण्यात तिला ३ वेळा साड्या चेंज करायच्या होत्या. तिचा हा डान्स शाळेत इतका गाजला की तिला शाळेत प्रत्येक जण एका खास नावाने हाक मारु लागले.

देवदास सिनेमातील गाण्यावर डान्स केल्यामुळे प्राजक्ताला सगळे ' ए पारो' याच नावाने हाक मारु लागले होते. विशेष म्हणजे आपण प्रसिद्ध होतोय ही गोष्ट त्यावेळी प्राजक्ताला फार सुखावणारी होती.  दरम्यान, प्राजक्ता आज लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. प्राजक्ता केवळ अभिनेत्री नसून एक व्यावसायिकादेखील आहे. प्राजक्तराज हा तिचा स्वत:चा एक स्वतंत्र दागिण्यांचा ब्रँडही आहे. 

टॅग्स :प्राजक्ता माळीसिनेमासेलिब्रिटी