Join us

कान्हा चित्रपटातील मित्रा गाणं प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 18:16 IST

प्रताप सरनाईक निर्मित आणि अवधुत गुप्ते दिग्दर्शित 'कान्हा' या चित्रपटातील मित्रा हे गाणं सोशलमिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. विहंग ग्रुप आणि यंगबेरी एंटरटेनमेंट यांची प्रस्तुती असलेला 'कान्हा' हा चित्रपट आहे.

प्रताप सरनाईक निर्मित आणि अवधुत गुप्ते दिग्दर्शित 'कान्हा' या चित्रपटातील मित्रा हे गाणं सोशलमिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. विहंग ग्रुप आणि यंगबेरी एंटरटेनमेंट यांची प्रस्तुती असलेला 'कान्हा' हा चित्रपट आहे.  थरांचं जोरदार धुमशान घालणारं, कान्हाच्या हंडीची शान वाढणारं 'मित्रा' या गाण्याला आदर्श शिंदे आणि रोहित राऊत या दोघांचा दमदार आवाज दिला आहे. तर अवधूत गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. तर या दही हंडीच्या गाण्याचे बोल वैभव जोशीने लिहिले आहेत. या चित्रपटात वैभव तत्ववागी, गश्मिर महाजन व गौरी नलावडे या कलाकारांच समावेश आहे.