Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिस्को सन्याच्या ट्रेलर आणि सॉंग लॉंचचा जय चिंगाबुंगा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 13:41 IST

नाचीज को सन्या कहते है...डिस्को सन्या,अशी तुफान डायलॉगबाजी करणारा डिस्को सन्या हा ५ आॅगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच मुंबई स्थित फेमस स्टुडिओ मध्ये या बहुचर्चित डिस्को सन्या चित्रपटाचे ट्रेलर आणि सॉंग लॉंच करण्यात आला.

 नाचीज को सन्या कहते है...डिस्को सन्या,अशी तुफान डायलॉगबाजी करणारा डिस्को सन्या हा ५ आॅगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच मुंबई स्थित फेमस स्टुडिओ मध्ये या बहुचर्चित डिस्को सन्या चित्रपटाचे ट्रेलर आणि सॉंग लॉंच करण्यात आला. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत भूतनाथ रिटर्न्स या चित्रपटात रूपेरी पडदा गाजवून राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरलेला महाराष्ट्राचा लाडका वंडर किड पार्थ भालेराव डिस्को सन्या या मराठी चित्रपटातून पहिल्यांदाच लीड रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात एकूण 3 गीते व एक प्रमोशनल सॉंग आहे. सर्व धर्म समभाव असा संदेश देणाºया  जय हरी विठ्ठला,अल्लाह हू अकबर या गाण्याच समावेश आहे. या गाण्यात बॉलिवूडमध्ये सुपरहिट गाणे देणारे गायक शबाब साबरी (प्रथमच मराठीत) यांच्या सुफी स्टाईलच्या जोडीला प्रख्यात लोकशाहीर नंदेश उमप यांच्या लोकसंगीताचा वापर करून आगळीवेगळी संगीतरचना केली गेली आहे. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजातील साधं माझं रूप या मराठमोळ्या गाण्याला दक्षिण भारतातील पारंपारिक वाद्यांचा ताल देण्याचा नवा प्रयोग करीत दाक्षिणात्य वादकांकडूनच तारा तपट्टाई या वाद्याचा सुरेख वापर या गाण्यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात हे वाद्य वाजविण्यासाठीच्या मयार्दा लक्षात घेता थेट चेन्नई येथे या गाण्यांचे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. तसेच चित्रपटातील सर्व गाणी ही दिग्दर्शक नियाज मुजावर यांच्या शब्दात सजलेली आहेत.