मराठी चित्रपटसृष्ट्रीत होणार वेगळा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 12:29 IST
सध्या मराठी इंडस्ट्रीची चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मराठी चित्रपटाने आपले नाव सातासमुद्रापारदेखील पोहचविले आहे. आता तर थेट ...
मराठी चित्रपटसृष्ट्रीत होणार वेगळा प्रयत्न
सध्या मराठी इंडस्ट्रीची चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मराठी चित्रपटाने आपले नाव सातासमुद्रापारदेखील पोहचविले आहे. आता तर थेट मराठी इंडस्ट्रीत वेगळा प्ऱयत्न होणार आहे. हा प्ऱयत्न एल. जी प्रोडक्शन्स, सदानंद (पप्पू) लाड व अंकुर चित्र निर्मित करणार आहे. हे प्रॉडक्शन हाऊस २६ फेब्रुवारीला चित्रपटांचा महोत्सव भरविणार आहे. या दिवशी हे प्रॉडक्शन हाऊस एकाचं वेळी- एक नाही, दोन नाही, तीन नाही तर पाँच का धमाका असलेली ५ चित्रपट, ५ थेटर, ५ शो आॅफर घेऊन येणार आहेत. मराठी चित्रपट नेहमीच एका उंचीवर राहिला असून, आता त्याच्या आर्थिक आकडेवाढीमुळे तो अधिकच दजेर्दार आणि उच्च पातळीवर गेला असल्याचे काही महिन्यांपासून आपणास दिसून येते. आजवर बॉलीवुड अथवा हॉलीवुडमध्ये सुद्धा एकाचं प्रोडक्शन हाऊसने एकाचं वेळी पाच-पाच चित्रपटांचे प्रकाशन करण्याची जोखीम कधीच उचललेली नसताना मराठी चित्रपट सृष्टीत प्रथमच एल. जी प्रोडक्शन्स, सदानंद (पप्पू) लाड व अंकुर चित्र यांनी हा प्रयत्न केला आहे. धुरपी, सावळ, कुंभारवाडा डोंगरी, स्वामी, एक कटिंग चाय १/२ यांसारख्या एका पेक्षा एक अशा पाच दर्जेदार चित्रपटांचे एकाचवेळी प्रदर्शन कारण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. एल. जी प्रोडक्शन्स, सदानंद (पप्पू) लाड व अंकुर चित्र निर्मित, प्राध्यापक देवदत्त हुसळे कथित व शशिकांत तुपे दिग्दर्शित धुरपी, प्रदीप म्हापसेकर कथित व श्री भगवान दास दिग्दर्शित सावळ, सदानंद (पप्पू) लाड कथित व सदानंद (पप्पू) लाड आणि शशिकांत तुपे दिग्दर्शित कुंभारवाडा डोंगरी, सदानंद लाड कथित व अंकुर लाड आणि रमेश सुर्वे दिग्दर्शित स्वामी त्याचप्रमाणे जय तारी कथित व दिग्दर्शित एक कटिंग चाय १/२ यांसारखे वेगवेगळे विषय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.