Join us

मराठी सिनेसृष्टीतील या दिग्गज अभिनेत्याचा मुलगा आहे शुभंकर तावडे, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 08:00 IST

शुभंकरचे वडील मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत.त्यामुळेच अभिनयाचं बाळकडू शुभंकरला घरातूनच मिळालं.

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं.  तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला अभिनेता शुभंकर तावडेबाबत सांगणार आहोत. 

मराठी सिनेसृष्टी असेच बरेच अभिनेते आहेत ज्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत  नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये स्टार किड्स म्हणून पदार्पण केलं. अभिनेता शुभंकर तावडेही त्यापैकी एक आहे. शुभंकरचे वडील मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळेच अभिनयाचं बाळकडू शुभंकरला घरातूनच मिळालं.  शुभंकर ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे (Sunil Tawde ) यांचा मुलगा आहे. सुनील तावडे गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्री मध्ये कार्यरत आहेत. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. 

शुभंकरचे शिक्षण मुंबईमध्येच झाले आहे. तो मुंबईच्या रुईया कॉलेजचा विद्यार्थी आहे. मुंबईच्या ड्रामास्कूल मधून त्याने आपला अभिनय आणि फिल्ममेकींग चा कोर्स पूर्ण केला आहे. कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये कामे केली आहेत. कॉलेज मध्ये असताना त्याने अनेक सांस्कृतिक कर्यक्रमांमध्ये भाग घेत आपला अभिनय सुरू केला.

‘डबल सीट’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. यानंतर ‘कागर’ या चित्रपटात तो अभिनेत्री रिंकू राजगुरू बरोबर प्रमुख भूमिकेत दिसला होता. ‘काळे धंदे’ या वेब सिरीज मध्येही त्याने भूमिका साकारली. खास म्हणजे, या सीरिजमध्ये तावडे बापलेकांची जोडी पहिल्यांदा एकत्र दिसली होती. वडीलांप्रमाणेच शुभंकर एक गुणी अभिनेता आहे.

टॅग्स :सेलिब्रिटी