Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आदिनाथ कोठारे आणि त्याची गोंडस जिजाचा फोटो तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 11:05 IST

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात जानेवारीला नव्या पाहुण्याचे आगमन झाले असून उर्मिलाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ...

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात जानेवारीला नव्या पाहुण्याचे आगमन झाले असून उर्मिलाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनाने कोठारे कुटुंब प्रचंड खूश झाले आहेत. सध्या त्यांचा सगळा वेळ हा या चिमुकलीच्या अवतीभवतीच जात आहे. तिच्या स्वागताची त्यांनी जोरदार तयारी केली होती. आदिनाथ आणि उर्मिला यांनी नुकतेच त्यांच्या मुलीचे नाव ठेवले असून तिचे नाव जिजा आहे. आदिनाथने सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तिचे नाव सगळ्यांना सांगितले होते. एवढेच नव्हे तर या गोंडस जिजाचे फोटो देखील आदिनाथने सोशल मीडियावर शेअर केले होते. उर्मिला आणि आदिनाथ त्यांच्या सोशल नेटवर्किंग साइटवर त्यांच्या या लाडक्या चिमुकलीचे फोटो पोस्ट करत असतात आणि त्यांचे चाहते देखील या फोटोंना भरभरून लाईक्स देतात. काही दिवसांपूर्वी तर उर्मिलाने जिजाचा स्वीमिंग करतानाचा व्हिडिओ तसेच तिचा आणि जिजाचा एक सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता आदिनाथने सोशल मीडियावर त्याचा आणि जिजाचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. बाप-लेकीच्या या फोटोचे सोशल मीडियावर सध्या चांगलेच कौतुक होत आहे. या फोटोत जिजा खूपच छान दिसत आहे. उर्मिला आणि जिजाच्या या फोटोला आतापर्यंत अनेक लोकांनी लाईक केले आहे. तसेच अनेकांनी त्यांना हा फोटो खूप आवडला असल्याचे प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगितले आहे.आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केले आहे. तसेच अनेक समारंभ, पुरस्कार सोहळ्यात त्यांना एकत्र पाहिले जाते. आदिनाथ आणि उर्मिलाचे अनेक फॅन्स असून त्यांना त्यांची जोडी खूपच आवडते. उर्मिला आणि आदिनाथ यांची लव्ह स्टोरी देखील खूप इंटरेस्टिंग आहे. शुभ मंगल सावधान हा उर्मिलाला पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत होती तर आदिनाथ या चित्रपटाचा साहाय्यक दिग्दर्शक होता. त्याचे वडील महेश कोठारे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांना तो या चित्रपटासाठी असिस्ट करत होता. या चित्रपटाच्या काही कामास्तव उर्मिला आदिनाथच्या घरी आली असता आदिनाथने सगळ्यात पहिल्यांदा उर्मिलाला पाहिले होते आणि तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता. या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची मैत्री झाली. चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतरही ते एकमेकांना भेटू लागले. पुण्यातील लॉ कॉलेज जवळील एका कॉफी शॉपमध्ये आदिनाथने उर्मिलाला प्रपोज केले होते. अनेक वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २० डिसेंबर २०११मध्ये लग्न केले.Also Read : आदिनाथ कोठारे करणार माधुरी दीक्षितसोबत काम