Join us

सुबकची परंपरा कोणी मोडली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 14:54 IST

           अभिनेता सुनील बर्वेने चित्रपट, मालिका आणि रंगभूमी गाजवून प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची जागा निर्माण ...

 
          अभिनेता सुनील बर्वेने चित्रपट, मालिका आणि रंगभूमी गाजवून प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची जागा निर्माण केली आहे. सुनील नेहमीच आपल्याला विविध भूमिकांमध्ये पाहायला मिळतो. सध्या त्याचे अमर फोटो स्टुडिओ हे नाटक रंगमंचावर सुरू आहे. या नाटकाचा २५ वा प्रयोग लवकरच होणार आहे. खरेतर सुबकचे प्रत्येक नाटक हे २५ प्रयोग झाले कि बंद होते. पंचवीसाव्या प्रयोगानंतर पुन्हा प्रयोग होत नाही. सुनीलने सुबकची नाटके आधी केली आहेत. म्हणूनच त्याला पंचवीसाव्या प्रयोगाची आठवण झाली. कोणत्याही प्रयोगाचा शेवट असला कि आम्ही कलाकार भारावून जायचो असे त्याने सोशल मीडियावर लिहिले आहे. आता अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचा देखील पंचवीसावा प्रयोग होत आहे. मग तुम्ही म्हणाल कि हे नाटक आता रंगमंचाचा निरोप घेणार का? तर तसे आता होणार नाहीये. सुबकची इतक्या वर्षांची ही परंपरा अमर फोटो स्टुडिओने मोडून काढली आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता हे नाटक आता सुरुच राहणार असल्याने सुनीलला आनंद झाला आहे. तो सांगतोय, ''आता वेळ बदललीय, आधी पालक मुलांना नाटक दाखवायला आणायचे. पण आता मुलेच पालकांना नाटकाच्या प्रयोगांना घेऊन येत आहेत.'' सध्याच्या पिढीने रंगमंचाकडे पाठ फिरवल्याची सगळीकडे बोंबाबोंब आहे सुनीलने मात्र ही गोष्ट खोटी असल्याचे लिहिले आहे. ते काहीही असले तरी अमर फोटो स्टुडिओचे प्रयोग चालु राहणार असल्याने नाट्यरसिकांना मात्र मेजवानीच मिळाली आहे.