Join us

'पिंडदान'विषयी सेलिब्रेटींमध्ये उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 13:32 IST

 फॅशन इंडस्ट्रीतलं मोठं नाव असलेल्या बंटी प्रशांत यांच्या 'पिंडदान' या चित्रपटाविषयी बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत मोठी उत्सुकता निर्माण झाली ...

 फॅशन इंडस्ट्रीतलं मोठं नाव असलेल्या बंटी प्रशांत यांच्या 'पिंडदान' या चित्रपटाविषयी बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मॉडेल-अभिनेत्री मुग्धा गोडसेपासून ते अभिनेता भूषण प्रधानपर्यंत अनेक सेलिब्रेटींनी बंटी प्रशांत यांना या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या असून, चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.  सारथी एंटरटेन्मेंटच्या पूनम शेंडे यांनी प्रस्तुत केलेल्या पिंडदान या चित्रपटाची निर्मिती उदय पिक्चर्स, अश्तिका इरा एलएलपी यांनी केली आहे. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ बंटी प्रशांत फॅशन इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनासाठी मिस इंडिया पूजा बत्रा, मुग्धा गोडसे, प्राची देसाई, तेजस्विनी पंडित, भूषण प्रधान असे आताचे आघाडीचे कलाकार फॅशनच्या रॅम्पवरून चित्रपटसृष्टीत आले. आणि आता याच स्टार कलाकारांनी दिग्दर्शक बंटी प्रशांत यांनी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, मनवा नाईक, प्रसाद पंडित, संजय कुलकर्णी, माधव अभ्यंकर, फरीदा दादी कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट १७ जूनला प्रदर्शित होणार आहे.