'जाणूनबुजून' नाटकाचा होणार सिनेमा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 15:50 IST
गाजलेल्या नाटकावर सिनेमा बनणं हा काही आता नवा ट्रेंड राहिलेला नाही. नटसम्राट, श्रीमंत दामोदर पंत, माकडाच्य हाती शॅम्पेन, लोच्या ...
'जाणूनबुजून' नाटकाचा होणार सिनेमा ?
गाजलेल्या नाटकावर सिनेमा बनणं हा काही आता नवा ट्रेंड राहिलेला नाही. नटसम्राट, श्रीमंत दामोदर पंत, माकडाच्य हाती शॅम्पेन, लोच्या झाला रे, बी.पी. अशा नाटकांवर आधारित सिनेमा रुपेरी पडद्यावर गाजले.आता याच यादीत आणखी एक नाव जोडलं जातंय. रंगभूमीवर गाजलेल्या 'जाणूनबुजून' हे नाटक लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे.प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संतोष पवार या नाटकाला सिनेमारुपात रसिकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करतायत.तेरा वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेलं हे तुफान गाजलं होतं.यांत संतोष पवार आणि आशीष पवार यांच्या अभिनयाची जुगलबंदी रसिकांनी अनुभवली होती. मनोरंजन करता करता सत्य परिस्थितीची जाण करुन देणारं हे नाटक तुफान हिट ठरलं होतं. त्यामुळंच या नाटकावर सिनेमा बनवण्याचा संतोष पवार यांचा मानस आहे. यासाठी सध्या चर्चा सुरु असून जुळवाजुळव करत असल्याचंही संतोष पवार यांनी संकेत दिलेत.. त्यामुळं सारं काही जुळून आल्यास रुपेरी पडद्यावर जाणूनबुजून लवकरच अवतरणार आहे.