राकेश आणि मंजिरीची केमस्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 15:40 IST
बॉलिवुडमधील मराठमोळी कलाकार आता मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. राकेश बापट आणि मंजिरी फडणीस या दोन मराठमोळी कलाकार एका ...
राकेश आणि मंजिरीची केमस्ट्री
बॉलिवुडमधील मराठमोळी कलाकार आता मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. राकेश बापट आणि मंजिरी फडणीस या दोन मराठमोळी कलाकार एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव सर्वमंगल सावधान असे आहे. या चित्रपटात या दोघांची केमस्ट्री प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. यापूर्वी राकेशने बॉलिवुडमध्ये तुम बिन हा चित्रपट केला होता. तसेच वृंदावन या चित्रपटातून राकेशने मराठी चित्रपटसृष्ट्रीत पदापर्ण केले होते. तर मंजिरी ही जाने तू या जाने ना या चित्रपटात झळकली होती. सर्वमंगल सावधान या चित्रपटाविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना राकेश म्हणाला, पहिल्यांदा मंजिरीसोबत काम करण्याचा अनुभव छान होता. आमच्या दोघांना ही मातृभाषेत काम करायचं होतं. त्यामुळे या चित्रपटाच्याद्वारे आमच्या दोघांची ही इच्छा पूर्ण झाली. मंजिरीसोबत काम करताना मला खरंच खूप कर्म्फेटेबल वाटलं. तसेच आमच्या दोघांची ही केमस्ट्री नक्कीच प्रेक्षकांना भावेल. तर या चित्रपटाविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना मंजिरी म्हणाली, राकेशसोबत सेटवर एकदमच धमाल केली. या चित्रपटाचे शेवटचे काही चित्रिकरण शिल्ल्क आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटासाठी थोडी वाट पाहावी लागेल. सर्वमंगल सावधान हा चित्रपटाचे दिग्दर्शक राहील खान यांनी केले आहे.