Join us

डोण्ट वरी बी नाटकाची शंभरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 14:07 IST

 अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री स्पृहा जोशी या जोडीचे डोण्ट वरी बी या नाटकाची चर्चा रंगू लागली आहे. ही ...

 अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री स्पृहा जोशी या जोडीचे डोण्ट वरी बी या नाटकाची चर्चा रंगू लागली आहे. ही जोडी आॅन स्क्रिन जेवढी लोकप्रिय झाली तेवढीच रंगभूमीवर देखील या जोडीने धमाल केली आहे. या जोडीचे डोण्ट वरी हॅपी हे नाटक लवकरच शंभरचा टप्पा पार करत आहे. प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे या नाटकाने ९९ यशस्वी प्रयोग पार पाडले आणि लवकरच १०० वा प्रयोग पुणे येथील यशवंतराव चव्हाण येथे साजरा करण्यात येणार आहे. सोनल प्रोडक्शन निर्मित डोन्ट वरी बी हॅप्पी या नाटकाचं लिखाण मिहीर राजदा यांनी केले आहे. दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले आहे.