खारेपाट महोत्सवात आज रंगणार सिलेब्रिटी नाईट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 16:39 IST
महिलांच सक्षमीकरण, संस्कृती संवर्धनाची जबाबदारी, विविध कलागुणांचे सादरीकरण आणि सोबतच महिला बचत गटाच्या उत्पादनास बाजारपेठ मिळावी या हेतूने खारेपाट ...
खारेपाट महोत्सवात आज रंगणार सिलेब्रिटी नाईट
महिलांच सक्षमीकरण, संस्कृती संवर्धनाची जबाबदारी, विविध कलागुणांचे सादरीकरण आणि सोबतच महिला बचत गटाच्या उत्पादनास बाजारपेठ मिळावी या हेतूने खारेपाट महोत्सव व्यासपीठ निर्माण केले आहे. तसेच या महोत्सवात कलाकारदेखील सहभागी होऊन महिला बचत गटाच्या उत्पादनाला एक प्रकारचे प्रोत्साहनच देत असतात. आज खारेपाट सिलेब्रिटी नाईट या कार्यक्रमाने या महोत्सवला चार चाँद लागणार आहे. मराठी हिंदी गाणी, नृत्य, स्किट यांची धमाल मैफिल आवडत्या कलाकारांनी रंगणार आहे. श्रेया बुगडे, भाऊ कदम, वैशाली सामंत, राहुल सक्सेना, उर्मिला धनगर, शर्वरी जेमिनीस हे सर्व कलाकार खारेपाट महोत्सवाच्या आनंदात रंग भरणार आहेत. या महोत्सवाचे विषेश म्हणजे यामध्ये १५० पेक्षा जास्त महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग, अफाट गर्दी, असंख्य स्टॉल्स आणि चविष्ट खाण्याच्या पदार्थांचा आस्वाद घेता येतो. आता हेच पाहा ना, अभिनेता भरत जाधव, चैत्राली गुप्ते, मयुरेश पेम,परी तेलंग, स्मिता गोंदकर आणि कमलाकर सातपुते या कलाकारांनीदेखील आॅल द बेस्ट २ आणि सौजन्याची ऐशीतैशी हे नाटक या महोत्सवात सादर केले आहेत. झेप फाउंडेशन आयोजित खारेपाट महोत्सवचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषी व संरक्षण मंत्री मा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या भव्य उद्घाटन सोहळ्याला झेप फाउंडेशनच्या अध्यक्षा चित्रा पाटील, अनेक मान्यवर तसेच जेष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे या कलाकारांची उपस्थिती होती. बुलेटराणींचा सहभाग, ढोल ताशा पथक, वारकरी दर्शन यासह खारेपाट संस्कृतीचं दर्शन घडविणाºया शुभारंभाच्या रॅलीने सर्वच भारावून गेले. कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजन यांचं समीकरण असलेल्या खारेपाट महोत्सवात प्रेक्षक आज आनंद घेऊ शकणार आहेत. अलिबाग मध्ये असलेल्या या खारेपाट महोत्सवाचा आनंद स्थानिक आणि पर्यटक २५ डिसेंबर घेऊ शकणार आहे.