Join us

उत्सव २०१६ संगीत रजनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 18:41 IST

मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालय व कलर्स मराठी वाहिनी यांचे संयुक्त विद्यमाने निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली ...

मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालय व कलर्स मराठी वाहिनी यांचे संयुक्त विद्यमाने निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवर अतिथी आणि रेल्वे पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांसाठी उत्सव २०१६- हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबापुरीच्या रक्षणासाठी नेहेमीच पोलीस विभाग सदैव सतर्क असतो, मग ते लोहमार्ग पोलीस असो वा अन्य विभाग. कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन चोखरीत्या पार पाडले जात आहे कि नाही याच्यावर त्यांचे कटाक्षाने नियंत्रण असते. याच आपल्या लोहमार्ग मुंबई पोलीसांच्या सन्मानाखातर आणि हे सगळे पोलीस अधिकारी आपल्यासाठी करत असलेल्या मौल्यवान कायार्साठी कलर्स मराठीने त्यांना एक मानवंदना देण्यासाठी वा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्सव २०१६ संगीत रजनी हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुयश टिळक आणि पुष्कर श्रोत्री यांनी केले. कार्यक्रमामध्ये मानसी नाईक, उर्मिला कानेटकर, प्राजक्ता माळी, अभिजीत केळकर आणि साक्षी तिसगावकर यांनी अप्रतिम नृत्य केले तर अरुण कदम, अंशुमन विचारे, विशाखा सुभेदार, समीर चौगुले यांच्या विनोदाने जमलेल्या सगळ्यांना पोट धरून हसण्यास भाग पाडले तर वैशाली माडे हिच्या गाण्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली. हा कार्यक्रम प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीवर ४ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,, प्रकाश मेहता दिपक केसरकर,किरीट सोमय्या, सतीश माथुर तसेच  महाराष्ट्र पोलीस दलातील, बृहन्मुंबई महानगरपालीका, मंत्रालय मुंबई येथील  मान्यवर वरिष्ठ अधिकारी आणि कलर्स मराठी वाहिनीचे प्रमुख अनुज पोद्दार व रोटरी क्लब, मुंबई यांचे पदाधिकारी उपस्थित होते.