Join us
Daily Top 2Weekly Top 5

कास्टिंग काऊच... पुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 17:08 IST

काही दिवसांपूर्वी अभिनेता अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांचा कास्टिंग काऊच हा वेब शोने सोशलमीडियावर धमाल केली होती. या वेबशोमध्ये सई ताम्हणकर, प्रिया बापट, राधिका आपटे, श्रेया पिळगावकर अशा अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली आहे. आता पुन्हा या वेब शोचा सेंकद सीझन येत आहे

 काही दिवसांपूर्वी अभिनेता अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांचा कास्टिंग काऊच हा वेब शोने सोशलमीडियावर धमाल केली होती. या वेबशोमध्ये सई ताम्हणकर, प्रिया बापट, राधिका आपटे, श्रेया पिळगावकर अशा अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली आहे. आता पुन्हा या वेब शोचा सेंकद सीझन येत आहे. त्यामुळे अमेयच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या सेकंद सीझनचा नुकताच सोशलमीडियावर टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.  या वेब शोच्या टीझरला प्र्रेक्षकांनी सोशलमीडियावर भरभरून पसंती दिली आहे. भाडीपा म्हणजेच भारतीय डिजीटल पार्टी प्रस्तुत कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण सेकंड सीझन हा वेब शो आहे. त्यांच्या पहिल्या वेब शोमध्ये अमेय आणि निपुणने आपल्यापेक्षा मोठया असणाºया अभिनेत्रींसोबत मजा, मस्ती आणि धमाल करताना प्रेक्षकांनी पाहिले आहे. आता मात्र कास्टिंग काऊचच्या सेकंद सीझनमध्ये अमेय आणि निपुण नक्की कोणत्या भूमिकेत असणार आहे हे अदयापदेखील गुलदस्त्यात आहे. अभिनेता अमेय वाघ हा दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. या मालिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच या मालिकेनंतर तो घंटा या चित्रपटातदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे सध्या त्याचे अमर फोटो स्टुडिओ हे नाटकदेखील चर्चेत आहे. या नाटकमध्ये त्याच्यासोबत सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे, सखी गोखले या कलाकारांचादेखील समावेश आहे. आता तो एका रियालिटी शोच्या माध्यमातून सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अमेयला एकापाठोपाठ वेब शो, नाटक, मालिका आणि चित्रपट पाहता त्याला लॉटरी लागली असे म्हणण्यास हरकत नाही.