अभिनेता सक्षम कुलकर्णी हा आगामी चित्रपट घंटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दे धक्का, शिक्षणाच्या आ़यचा घो आणि काकस्पर्श या चित्रपट केल्यानंतर सक्षम बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर परततो आहे. घंटा या त्याच्या आगामी चित्रपटाविषयी सक्षम लोकमत सीएनएक्सला सांगतो , दिग्दर्शक शैलेश यांनी ज्यावेळी चित्रपटाची कथा ऐकवली त्यावेळी खरंच खूप आनंद झाला. कारण अशा स्क्रिप्टची मी खूप वाट पाहत होतो. त्यामुळे ही संधी मिळताच मी चित्रपटाला लगेच होकार दिला. तसेच मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळा विषय घंटा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याचबरोबर अमेय आणि आरोहसोबत काम करण्याचा अनुभवदेखील खूप छान होता. आज बऱ्याच वर्षानंतर चित्रपटाचे प्रमोशन, शेडयूल या गोष्टी पुन्हा अनुभवताना अधिक आनंद होत आहे. चला तर, सक्षम अगेन रेडी फॉर घंटा. पण प्रेक्षकांना फक्त १४ ऑक्टोबरपर्यत वाट पाहावी लागणार आहे.
सक्षम इज बॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 10:37 IST