बॉलिवूडच्या वाटेवर आकाश?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 15:29 IST
सैराट फेम आकाश ठोसर नुकताच उमंग कुमारच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. उमंगने मेरी कोम, सरबजीत यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले ...
बॉलिवूडच्या वाटेवर आकाश?
सैराट फेम आकाश ठोसर नुकताच उमंग कुमारच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. उमंगने मेरी कोम, सरबजीत यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच मेरी कोम या त्याच्या चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. उमंग धे धक्का या महेश मांजरेकर दिग्दर्शित मराठी चित्रपटाचा लवकरच हिंदीत रिमेक बनवणार आहे. या चित्रपटामुळे त्याचे मराठी इंडस्ट्रीशी कनेक्शन जोडले गेले आहे. पण त्याच्या वाढदिवसाला आकाश आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आकाश एखादा हिंदी चित्रपट करत आहे का अशीही सध्या चर्चा सुरू आहे. आकाश सैराटनंतर महेश मांजरेकर यांच्या एका मराठी चित्रपटात काम करत आहे. पण त्याने अद्याप तरी हिंदी चित्रपट साइन केलेला ऐकीवात नाही. पण आकाश बॉलिवूडच्या वाटेवर असल्याचे आता वाटू लागले आहे. या पार्टीत आकाश संदीप सिंगसोबत आला होता. संदीप मेरी कोम या चित्रपटाचा सहनिर्माता तर सरबजीत या चित्रपटाचा निर्माता आहे. आकाश पार्टीतही सतत संदीपसोबतच होता. त्यामुळे तो बॉलिवूडच्या चित्रपटात लवकरच झळकेल असे म्हणायला काहीच हरकत नाही.