Join us

'अँड जरा हटके'नंतर 'सायकल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 13:47 IST

  Exculsive - बेनझीर जमादार 'सा यकल' नाव आणि दिग्दर्शक प्रकाश कुंटे म्हणजे हा चित्रपट व्यथा, वेदना मांडणारा असावा असं ...

  Exculsive - बेनझीर जमादार 'सा यकल' नाव आणि दिग्दर्शक प्रकाश कुंटे म्हणजे हा चित्रपट व्यथा, वेदना मांडणारा असावा असं वाटतं; पण नात्यांचा शोध घेणारे संवेदनशील विषय कॉफी आणि बरंच काही, अँँड जरा हटके यासारख्या संवेदनशील विषयांनंतर दिग्दर्शक प्रकाश कुंटे आता कॉमेडीकडे वळत आहेत. 'सायकल' नावाचा विनोदाचा धमाका घेऊन ते येत आहेत. 'लोकमत सीएनएक्स'शी बोलताना प्रकाश कुंटे म्हणाले, ''कॉमेडीचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. अभिनेता हृषीकेश जोशी, भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव असा ट्रिपल धमाका पाहायला मिळणार आहे. यांच्यासोबत दीप्ती लेले ही अभिनेत्री आहे. याचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. कथादेखील चित्रपटाच्या नावाप्रमाणेच हटके आहे.'' कुंटे म्हणाले, ''माझा कॉमेडीचा पहिलाच प्रयोग असल्याने मीदेखील या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खूप उत्सुक आहे. हृषीकेश आणि भाऊ कदम यांच्यासारख्या कलाकारांसोबत काम करणे हा एक धमाल अनुभव होता.''