Join us  

भुषण प्रधानने सांगितले त्याच्या लग्नाच्या प्लानविषयी, कधी करणार लग्न याचा केला खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 2:41 PM

भुषणला मराठी चित्रपटसृष्टीतील मोस्ट एलिजेबल बॅचलर मानले जाते. त्यामुळे तो लग्न कधी करणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना नेहमीच लागलेली असते.

ठळक मुद्देभुषणनेच त्याच्या फॅन्ससोबतच्या संवादाचा स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर शेअर केला आहे.

भुषण प्रधान सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. तसेच तो सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. त्याने नुकतेच इन्स्टाग्रामवरील आस्क मी एनिथिंगद्वारे चाहत्यांशी खूप साऱ्या गप्पा मारल्या.

भुषणला मराठी चित्रपटसृष्टीतील मोस्ट एलिजेबल बॅचलर मानले जाते. त्यामुळे तो लग्न कधी करणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना नेहमीच लागलेली असते. त्यामुळे भुषणला अनेक फॅन्सनी तू लग्न कधी करणार, तसेच कोणाशी करणार असे प्रश्न विचारले त्यावर सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाहीये असे भुषणने उत्तर दिले. भुषणनेच त्याच्या फॅन्ससोबतच्या संवादाचा स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सतरंगी रे', 'मिस मॅच', 'टाईमपास', 'टाईमपास-2', 'कॉफी आणि बरंच काही' अशा विविध सिनेमांमध्ये भुषणने भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या होत्या. पिंजरा या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मराठीत मिळालेल्या यशानंतर भुषण आता बॉलिवूडकडे वळला आहे. तो सिमी जोसेफ यांच्या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत एन्ट्री करणार आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री रायमा सेनसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आठ वर्षांनंतर जय भवानी जय शिवाजी या मालिकेद्वारे भूषण छोट्या पडद्यावर परतत आहे. या मालिकेत तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. 

टॅग्स :भुषण प्रधान