Join us  

भूषण प्रधान गुणगुणतोय, हा सागरी किनारा….. समुद्र किनाऱ्यावर समाधान शोधतोय भूषण…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 2:44 PM

'सतरंगी रे', 'मिस मॅच', 'टाईमपास', 'टाईमपास-2', 'कॉफी आणि बरंच काही' अशा विविध सिनेमांमध्ये भूषणनं भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी आपल्या फॅन्ससह संवाद साधतात. त्यांच्यासह आगामी सिनेमा, ट्रेलर, भूमिका याविषयी गप्पा मारतात. या माध्यमातून रसिकांच्या प्रतिक्रिया थेट जाणून घेता येत असल्याने सेलिब्रिटी सोशल मीडियाला प्राधान्य देत आहेत. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेता भूषण प्रधान. आपल्या फॅन्सशी भूषण कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट असतो. आपले आगामी सिनेमा आणि त्याची माहिती भूषण फॅन्ससह शेअर करत असतो. शिवाय आपल्या फॅन्ससह काही चांगले विचारही शेअर करत असतो. भूषण फिटनेसबाबतही तितकाच सजग आहे. आपल्या फॅन्ससह तो फिटनेस मंत्रा शेअर करतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. समुद्र किनाऱ्यावर धम्माल करत असतानाचा फोटो फॅन्सच्या पसंतीस पात्र ठरत आहे. शांत अशा समुद्र किनाऱ्यावर समाधान शोधणाऱ्या भूषणने या फोटोला सुंदर कॅप्शन दिली आहे. बीच मोर…. वरी लेस ( समुद्र किनाऱ्यावर जाऊन आनंद घ्या, चिंता मिटवा) असं त्याने म्हटले आहे.  मिलिंद शिंदे यांच्या 'रे राया' या सिनेमानंतर भूषणने सध्या ब्रेक घेतला आहे. आपल्या मोकळ्या वेळेचा तो उपयोग जीवनात शांतता, समाधान मिळवण्यासाठी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

'सतरंगी रे', 'मिस मॅच', 'टाईमपास', 'टाईमपास-2', 'कॉफी आणि बरंच काही' अशा विविध सिनेमांमध्ये भूषणनं भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या आहेत. जिद्द आणि मेहनतीसह जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन यामुळे भूषणनं करियरमध्ये भरारी घेतली आहे. त्यामुळे जीवनाविषयीची त्याची पोस्ट रसिकांना आणि त्याच्या फॅन्सना नवी ऊर्जा देईल. तसंच भूषणप्रमाणेच त्याचे फॅन्सही जीवनाकडे आणि घडणा-या प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहतील यांत शंका नाही.    

टॅग्स :भुषण प्रधान