Join us

भूषण प्रधानने फॅन्सना दिला हा संदेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 15:40 IST

सोशल मीडियावर सेलिब्रिटी मंडळी बरीच अॅक्टिव्ह असतात. आपापल्या आयुष्यात घडणा-या घडामोडी, आगामी सिनेमा, त्यांचे ट्रेलर, पोस्टर याची प्रत्येक गोष्ट ...

सोशल मीडियावर सेलिब्रिटी मंडळी बरीच अॅक्टिव्ह असतात. आपापल्या आयुष्यात घडणा-या घडामोडी, आगामी सिनेमा, त्यांचे ट्रेलर, पोस्टर याची प्रत्येक गोष्ट ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट फॅन्सशी संवाद साधता येत असल्याने दिवसेंदिवस अधिकाधिक सेलिब्रिटी इथं रुळल्याचं पाहायला मिळते. या माध्यमातून रसिकांच्या प्रतिक्रिया थेट जाणून घेता येत असल्याने रसिक सोशल मीडियाला प्राधान्य देत आहेत. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेता भूषण प्रधान. आपल्या फॅन्सशी भूषण कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट असतो. आपले आगामी सिनेमा आणि त्याची माहिती भूषण फॅन्ससह शेअर करत असतो. शिवाय आपल्या फॅन्ससह काही चांगले विचारही शेअर करत असतो. जीवनात कितीही कठीण क्षण आले तरी खचून जाऊ नका. सकारात्मक विचार करा, सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक जीवन अशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससह शेअर केली आहे. तुमच्या पुढे कितीही कठीण प्रसंग आला तरी खचून जाऊ नका असा संदेशच भूषणनं आपल्या या पोस्टच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना दिला आहे. सतरंगी रे, मिस मॅच, टाईमपास, टाईमपास-2, कॉफी आणि बरंच काही अशा विविध सिनेमांमध्ये भूषणनं भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या आहेत. जिद्द आणि मेहनतीसह जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन यामुळे भूषणनं करियरमध्ये भरारी घेतली आहे. त्यामुळे जीवनाविषयीची त्याची पोस्ट रसिकांना आणि त्याच्या फॅन्सना नवी ऊर्जा देईल. तसंच भूषणप्रमाणेच त्याचे फॅन्सही जीवनाकडे आणि घडणा-या प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहतील यांत शंका नाही.