Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ कदम यांनी प्रेक्षकांची कोणती इच्छा पूर्ण केली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 13:57 IST

बॉलिवुडप्रमाणेच आता मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील गायन आणि अभिनय अशी दुय्यम भूमिका पार पडताना कलाकार पाहायला मिळत असतात. नुकतेच अभिनेत्री प्रिया बापट हिनेदेखील वजनदार या चित्रपटात गायन आणि अभिनय अशा दोन्ही जबाबदाºया उत्तमरीत्या पार पाडल्या आहेत. तिने या चित्रपटात गायलेल्या गोलू मोलू या गाण्याचेदेखील विशेष कौतुक होताना पाहायला मिळत आहेत.

बॉलिवुडप्रमाणेच आता मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील गायन आणि अभिनय अशी दुय्यम भूमिका पार पडताना कलाकार पाहायला मिळत असतात. नुकतेच अभिनेत्री प्रिया बापट हिनेदेखील वजनदार या चित्रपटात गायन आणि अभिनय अशा दोन्ही जबाबदाºया उत्तमरीत्या पार पाडल्या आहेत. तिने या चित्रपटात गायलेल्या गोलू मोलू या गाण्याचेदेखील विशेष कौतुक होताना पाहायला मिळत आहेत. आता अभिनेत्री प्रिया प्रमाणेच भाऊ कदमदेखील कोणत्या चित्रपटासाठी गाणं गातात का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असणार हे नक्की. मात्र प्रेक्षकांना पडलेल्या या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी लोकमत सीएनएक्सने भाऊ कदम यांच्याशी संवाद साधला. याविषयी भाऊ सांगतात, हे गाणे मी कोणत्या चित्रपटासाठी वगैरे गायले नाही. तसेच कोणत्या चित्रपटासाठी ही तयारीदेखील करत नाही. एका शोसाठी मी, मंगेश देसाई, संतोष जुवेकर, विजु माने, कुशल बद्रिके असे अनेक कलाकार लंडनला गेलो होतो. तिथे आम्ही आमचा कार्यक्रम सादर केला. त्यावेळी तेथील काही प्रेक्षकांनी फर्माइश केली की, भाऊनी एक गाणे गाऊन दाखवावे. त्यामुळे चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी एक गाणं गायलं. तसेच मी स्वप्नातदेखील कधी विचार केला नव्हता की, मला असे स्टेजवर गाणं गायला लागेल. पण केवळ चाहत्यांच्या प्रेमापोटी हे गाणं गायल आहे. प्रत्येक कलाकारासाठी चाहत्यांचा आनंद व प्रेम महत्वाचं असते. कारण प्रेक्षक आहेत तर कलाकार आहेत. खरचं  केवळ चाहत्यांच्या प्रेमापोटी भाऊनी गायिलेले हे गाणे नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असेल. तसेच भाऊंची ही वेगळी सुरूवातदेखील भन्नाट वाटली. नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसविणारे भाऊ आज गायक बनताना प्रेक्षकांनादेखील आश्चर्य वाटले असणार हे नक्की.