Join us

​भार्गवीने केला ख्रिसमस केक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 13:36 IST

सध्या सगळ््यांनाच ख्रिसमस साजरा करण्याचे वेध लागलेले आहेत. सगळीकडेच मस्त सांताक्लॉजला वेलकम करण्यासाठी झक्कास पार्टीजचे देखील आयोजन करण्यात आले ...

सध्या सगळ््यांनाच ख्रिसमस साजरा करण्याचे वेध लागलेले आहेत. सगळीकडेच मस्त सांताक्लॉजला वेलकम करण्यासाठी झक्कास पार्टीजचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तर ख्रिसमस मधील सर्वात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे केक. यम्मी केके खाण्याचा मोह तर या दिवशी सगळ््यांनाच होता. खरतर ख्रिसमसचे सेलिब्रेशन केक शिवाय अधुरेच आहे.  असाच नाताळासाठी अभिनेत्री भार्गवी चिरमुळे देखील मस्त टेस्टी केक बनवत आहे. भार्गवीने नुकताच हा केक तयार करतानाच मस्त फोटो सोशल साईट्सवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये भार्गवी सांताची टोपी घालुन फारच झक्कास दिसत आहे. ड्रायफ्रुट्स घातलेला चॉकलेटी केक बनवताना भार्गवी चांगलीच खुष दिसत आहे. एवढेच नाही तर हा केक बनविण्याची ती मजा देखील लुटत आहे. झिंगल बेल झिंगल बेल करीत नाचणाºया, सांतासोबत नाताळ साजरा करण्याचे स्वप्न तर सगळ््यांचेच असते. भार्गवी देखील ख्रिसमसच्या तयारीला लागली आहे. भार्गवी सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. तरीपण तिने नाताळाच्या सेलिब्रेशनसाठी वेळ काढून हा यम्मी केके बनविला आहे.