Join us

"हे असं सुख-समृद्धी..." भारत गणेशपुरे रमले शेतमळ्यात, व्हिडीओद्वारे दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 13:10 IST

भारत गणेशपुरे यांनी शेतामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Bharat Ganeshpure: स्ट्रगल करून मोठे झालेले मराठी ग्लॅमर इंडस्ट्रीतील एक नाव म्हणजे भारत गणेशपुरे. वैदर्भीय स्टाईल आणि वऱ्हाडी भाषेवर प्रभुत्व त्यामुळे त्यांनी प्रेक्षकांचे मनात खास स्थान निर्माण केले आहे. विविध ताकदीच्या भूमिक्या त्यांनी साकरल्या आहेत. अलीकडेच भारत गणेशपुरे यांनी शेतामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये गहू शेती पाहायला मिळत आहे.

भारत गणेशपुरे हे गावी शेतीत रमल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्याने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ते म्हणतात, "नमस्कार... तुम्ही मला नेहमी विचारता सारखं सारखं गावी का जातो? तर हे पाहा. हे सुख, समृद्धी पाहायला गावी यावं लागतं. आता शेतात गहू पेरला आहे. साधारण एका महिन्याने हा गहू घरच्या ताटात येऊ शकतो. गहू पूर्ण झाल्यावर मी एखादी झलक तुम्हाला नक्की दाखवेन". गणेशपुरे यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्याचे कौतुक केलं आहे. 

भारत गणेशपुरे एक लोकप्रिय व्यक्ती असले तरीही ते आपल्या मातीशी असलेली नाळ विसरलेले नाहीत. २०१४ साली सुरू झालेल्या 'चला हवा येऊ द्या' (Bharat Ganeshpure in Chala Hawa Yeu Dya) शोपासून भारत गणेशपुरे यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. भारत गणेशपुरे यांचा संघर्षही सोप्पा नव्हता. अपार कष्ट आणि मेहतनीच्या जोरावर ते इथपर्यंत पोहचले आहेत. भारत गणेशपुरे हे विदर्भातील अत्यंत साध्या कुटुंबातून आलेले आहेत. भारत गणेशपुरे यांच्या पत्नीचे नाव अर्चना गणेशपुरे आहे. त्या देखील दिसायला खूप सुंदर आहेत. भारत गणेशपुरे आपल्या पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

टॅग्स :भारत गणेशपुरेमराठी अभिनेताशेती