Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘एक होता वाल्या’ चित्रपटास सर्वाेत्कृष्ट राजकीय पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 19:33 IST

वास्तववादी व सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी असलेल्या ‘एक होता वाल्या’ सिनेमाला जयपूर आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात सर्वाेत्कृष्ट राजकीय सिनेमाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले....

वास्तववादी व सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी असलेल्या ‘एक होता वाल्या’ सिनेमाला जयपूर आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात सर्वाेत्कृष्ट राजकीय सिनेमाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.आदिवासी, कोळी व तत्सम हलबा, माना, गोवारी, धनगर, ठाकूर, गावीत, मन्येवारलू, धोबा, कोलघा, कोलचा आदी तीस पस्तीस आदिवासी जमातींच्या सामाजिक ज्वलंत प्रश्नावर आधारित वास्तववादी सिनेमा ‘एक होता वाल्या’ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त १४ एप्रिल २०१६ ला महाराष्ट्रत सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमात स्वांतत्र्यानंतरची बदलत जाणारी मानसिकता दाखविण्यात आली आहे. शरदचंद्र जाधव यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तसेच वाल्याची भूमिकासुद्धा शरदचंद्र यांनीच साकारली आहे. नंदकुमार पाटील, प्रियंका ससाणे, अरविंद धु, मनोहर भगत, सुनील सोनार, यशवंत जोशी आदींनी सिनेमात भूमिका साकारली आहे.