Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदा मराठी आणि बंगालीचा संगम, ८० टक्के बंगाली क्रू मेंबर असलेला मराठी चित्रपट लवकरच भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 15:23 IST

अवाच्छित या त्यांच्या पहिल्या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे चित्रपटाशी संबंधित ८० टक्के क्रू मेंबर बंगाली आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत नवनवे प्रयोग करण्यात येतायत. नवीन विषय आणि संहिता असलेले चित्रपट मराठीच नाहीतर तमाम सिनेप्रेमी रसिकांची मनं जिंकत आहे. अनेक अमराठी दिग्दर्शकांना मराठी चित्रपट भावतायत. त्यामुळेच की काय शुभो बासू नाग हे मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. नुकतंच अवाच्छित या त्यांच्या पहिल्या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे चित्रपटाशी संबंधित ८० टक्के क्रू मेंबर बंगाली आहेत.. प्रीतम चौधरी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, किशोर कदम, डॉ.मोहन आगाशे, सुहास जोशी, योगेश सोमण, बरुण चढ्ढा अशी तगडी स्टारकास्ट आहे. बाप-लेकाच्या नातं आणि त्यातून निर्माण होणारे प्रेमळ तसंच जटील बंध यावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. वृद्धाश्रम, त्याच्याशी तसंच तिथल्या सदस्यांशी असलेले बापाचं नातं आणि त्यातून घडणाऱ्या घडामोडींमधून चित्रपटाची कथा उलगडत जाणार आहे. प्रेम, मैत्री, निष्ठा, रोमान्स असं सगळं या चित्रपटात पाहता येणार आहे. या संपूर्ण चित्रपटाचं शुटिंग कोलकाता इथं होणार आहे. कोलकात्यामध्ये पूर्णपणे चित्रीत होणारा हा पहिला चित्रपट असेल. चित्रपटाची पटकथा आणि संवाद योगेश जोशी यांनी लिहिले असून गीत ओमकार जोशी यांनी तर संगीताची जबाबदारी अनुपम रॉय यांनी सांभाळलीय.