बॅन्जो चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 12:34 IST
रवी जाधव दिग्दर्शित बॅन्जो या चित्रपटात चित्रपटाची उत्सकुता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली आहे. कारण मध्यंतरी या चित्रपटाच्या सेटवरच्या गोष्टी, रितेशचा ...
बॅन्जो चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
रवी जाधव दिग्दर्शित बॅन्जो या चित्रपटात चित्रपटाची उत्सकुता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली आहे. कारण मध्यंतरी या चित्रपटाच्या सेटवरच्या गोष्टी, रितेशचा लूक, नर्गिसची स्टाईल या सर्व गोष्टी नेहमीच सोशलमिडीयामध्ये चर्चेत राहिल्या आहेत. आता, नुकतेच सोशलमिडीयावर बॅन्जो या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. रितेश देशमुख आणि बॉलीवुडची अभिनेत्री नर्गिस फकरी हे या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तसेच या चित्रपटात आचीर्ची देखील भूमिका असल्याचे समजते त्यामुळे या चित्रपटाची असलेली उत्सुकता आणखी वाढली आहे.